पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात वाहतूक विभागाकडून विविध ठिकाणी वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. ठराविक वेळेत हे बदल असणार आहेत. अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या वाहनांना यातून वगळण्यात आले आहे. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी यामुळे मदत होणार आहे. हे सर्व बदल प्रायोगिक तत्वावर (२४ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर) सुरू करण्यात आले आहेत. वाहतूक विभागाने केलेल्या बदलांबाबत नागरिकांना काही हरकती अथवा सूचना असतील तर त्या पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, ऑटो क्लस्टर, पिंपरी येथे लेखी स्वरूपात जमा करण्याचे आवाहन, वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.

No comments:
Post a Comment