पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या पंतप्रधान आवास योजनेच्या गृहप्रकल्पातील बांधकामांचा दर बाजारभावापेक्षा अधिक आहे. सदर प्रकल्पाचा ‘डीपीआर’ जाणीवपूर्वक चुकीचा पद्धतीने तयार केल्याबद्दल संबंधित अधिकार्यांवर कारवाईची मागणी शिवसेनेचे आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दुसर्यांदा केली आहे. त्याची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश संबंधित विभागास दिले आहेत, अशी माहिती आ. चाबुकस्वार यांनी बुधवारी (दि.26) पत्रकार परिषदेत दिली.

No comments:
Post a Comment