पुणे - प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सरकारने १ हजार ६०० अभियंते नेमण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागातील घरकुल योजनांचे तांत्रिक पर्यवेक्षण, नियंत्रण आणि मार्गदर्शन करण्याची जबाबदारी या अभियंत्यांवर राहणार आहे. या अभियंत्यांना ‘ग्रामीण गृहनिर्माण अभियंता’ म्हणून ओळखले जाणार असून, जिल्हा परिषद बाह्य यंत्रणेद्वारे त्यांची नेमणूक करणार आहेत. त्यामुळे आवास योजनेचे उद्दिष्ट पूर्ण होण्याबरोबरच १६०० अभियंत्यांनाही रोजगार उपलब्ध होणार आहे.
No comments:
Post a Comment