Monday, 22 October 2018

मिरची झाली “तिखट’, भेंडी गडगडली

पिंपरी- नवरात्रीनंतर मोशीतील नागेश्‍वर महाराज उपबाजारात भाजीपाल्याची आवक घटली आहे. फळभाज्यांमध्ये कांदा, घेवड्याची आवक वाढून भावदेखील वधारले. मिरचीची आवक स्थिर राहून भाव मात्र वधारले. याशिवाय बटाट्याची आवक 192 क्विंटलने घटली आहे. याशिवाय कोथिंबीरीची आवक घटूनही भाव मात्र चढेच आहेत. फळभाज्यांची एकूण आवक 894 क्विंटल झाली असून, पालेभाज्यांची आवक 20 हजार 630 गडड्या एवढी झाली आहे. फळभाज्यांची आवक 131 क्विंटलने घटली आहेत; तर पालेभाज्यांची आवक किरकोळ 220 गडड्यांनी वाढली आहे.

No comments:

Post a Comment