पिंपरी – पिंपरी महापालिका मुख्यालयाकडून गांधीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अवैध वाहने उभी राहत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. तसेच अहल्यादेवी होळकर चौकात मेट्रोचे काम सुरू असल्याने रस्ता अरूंद झाला असून तिथेही अवैध रिक्षा उभ्या राहत आहेत. यामुळे वाहतुकीस खोळंबा होऊन अपघात होण्याची शक्यता असल्याने वाहतूक पोलिसांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरीक करत आहेत.
No comments:
Post a Comment