पिंपरी चिंचवड : घर बचाव संघर्ष समितीच्या वतीने बाधितांनी गेल्या वर्षी १४ जून २०१७ रोजी प्रस्तावित एचसीएमटीआर ३० मीटर रिंग रोड विरोधात आंदोलन सुरू करण्यात आले. या लढ्यास ५०० दिवस पूर्ण झाल्यामुळे आज रोजी पिंपळे गुरव येथील महालक्ष्मी मंगल कार्यालय येथे संघर्ष समितीच्या वतीने कोपरा सभेचे आयोजन करण्यात आले होते. पिंपरी चिंचवड शहरातील गुरुद्वारा परिसर, बिजलीनगर, चिंचवडेनगर, वाल्हेकर वाडी, थेरगाव, रहाटणी, पिंपळे गुरव, कासारवाडी परिसरातील ३५०० पेक्षा जास्त घरे ही प्रस्तावित २८ कि मी रिंग रेल्वे रोड प्रकल्पामुळे बाधित होत आहेत. हजारो नागरिक रहिवाशी त्यामुळे रस्त्यावर येणार आहेत.
No comments:
Post a Comment