Friday, 21 December 2018

पीएफ देणे सर्व कंपन्याना बंधनकारक

पुणे : वंचित घटकांमधील कामगार आणि मजुरांना शासकीय सेवेचा लाभ आणि सेवानिवृत्तीनंतर आर्थिक लाभ व्हावा, यासाठी केंद्र शासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून यासाठी सर्व कामगारांना पीएफच्या अखत्यारित आणण्याचा निर्णय पीएफ कार्यालयाने घेतला आहे. त्याबाबतच्या सूचना सर्व कार्यालयांना देण्यात येणार आहेत. त्यानुसार सर्व कंपन्या आणि त्यांच्या कामगारांची संख्या पीएफ कार्यालयाला देणे बंधनकारक करण्यात येणार आहे. येत्या महिनाभरापासून त्याची अंमलबाजवणी करण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment