Friday, 21 December 2018

पीएमपीचा ‘जीएसटी’ देण्यास नकार

पुणे : महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) या कंपनीकडून पुरविल्या जाणार्‍या सीएनजीच्या बिलावर जीएसटी देण्यास पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) नकार दिला आहे. आगारांपर्यंत गॅस पाइपलाइन असल्याने आम्हाला जीएसटी लागू होत नसल्याचा दावा पीएमपी प्रशासनाने केला आहे. ही रक्कम जवळपास दहा कोटी रुपयांची आहे. पीएमपीच्या ताफ्यात जवळपास 1100 बस सीएनजीवर धावणार्‍या आहेत. या गाड्यांना एमएनजीएलकडून गॅसपुरवठा केला जातो. त्यासाठी पीएमपीच्या आगारांपर्यंत पाइपलाइनद्वारे गॅस पोहचविण्यात आलेला आहे.

No comments:

Post a Comment