पिंपरी - प्राधिकरणाने आकुर्डी मध्यवर्ती सुविधा केंद्रात, तसेच पेठ क्रमांक २६ येथे विकसित केलेली उद्याने उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत.
आकुर्डीतील सुमारे पावणेदोन एकरावरील उद्यानात विविध प्रकारची खेळणी बसविण्यात आली आहेत. रोप क्राऊलर, बॅलसिंग ब्रिज, रोप वॉक, जंपर्स अशा प्रकारच्या खेळण्यांचा त्यात समावेश आहे. ‘ॲडव्हेंचर पार्क’च्या धर्तीवर हे उद्यान विकसित करण्यात आले आहे. त्यानुसार जंपर्समध्ये मुलांना उंच उड्या मारता येतील. रोप वॉकमध्ये लोखंडी अँगलला दोरखंड अडकवून जमिनीपासून अँगलपर्यंत चढता येईल. तसेच हर्डल वॉकचीही (टप्प्याटप्प्याने उंच होत जाणारे आडवे लोखंडी अँगल) सोय करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त क्लाइंबिंग वॉल, ४०० मीटरचा जॉगिंग ट्रॅकही आहे. उद्यानात आठ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. महिला, पुरुष यांच्यासाठी आधुनिक प्रकारची प्रत्येकी दोन शौचालये बांधण्यात आली आहेत. ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी ‘गजिबो’ची सोय आहे. या प्रकल्पासाठी सुमारे दोन कोटी चार लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.
No comments:
Post a Comment