पवना नदीपात्र दूषित केल्याप्रकरणी थेरगाव परिसरातील लॉन्ड्री व्यावसायिकांवर व इतर दोन छोट्या व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा उचलला आहे. प्रमाणापेक्षा जास्त केमिकल पाण्यात मिसळून नदी प्रदूषण तसेच, नदीतील मासे मृत झाल्याप्रकरणी तेथील सर्व लॉन्ड्री चालकांना व्यवसाय बंद करण्याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटीस दिली आहे. अन्यथा, कारवाई करण्यात येईल, असे व्यावसायिकांना कळविण्यात आले आहे. ‘पुढारी’ ने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर अहवालानुसार कारवाई सुरू केली आहे.
No comments:
Post a Comment