Thursday, 28 February 2019

महापालिकेच्या सफाई कामगारांना

पिंपरी चिंचवड ः महापालिकेच्या कंत्राटी सफाई कामगारांना सुरक्षेची आवश्यकता असून त्यांना जीवनावश्य वस्तूंसह आरोग्याच्या सुविधा मोफत पुरविण्यात याव्यात, अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रुपचे अध्यक्ष सतीश कदम यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी आयुक्तांना निवेदन दिले.  त्यात म्हटले की, पिंपरी चिंचवड शहरात स्वच्छतेची कामे करणार्‍या कामगारांच्या आरोग्याबाबत महापालिका प्रशासन निष्काळजीपणा करीत आहे. कामगारांच्या सुरक्षिततेसाठी योजना असल्या तरी त्यांची अंमलबजावणी होत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे सफाई कामगारांच्या आरोग्याचा प्रश्‍न गंभीर होण्याची भीती आहे. सफाई कामगारांना सुरक्षेची आवश्यक साधने मिळत नसल्याने त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. हातमोजे, गमबुट, मास्क,रेनकोट, गणवेश,साबण, अशा किमान सुविधाही त्यांना पुरविल्या जात नसल्याने या कामगारांमध्ये कर्करोग, त्वचारोग, टीबी, श्‍वसनविकाराचे प्रमाण वाढत आहे. त्यातच आता पावसाळा सुरू झाल्याने पुढील तीन-महिने कामगारांना वाईट परिस्थितीत काम करावे लागते, असेही त्यांनी नमूद केले आहे.

No comments:

Post a Comment