पिंपरी : पिंपरीच्या उपप्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयाचे स्थलांतर गेल्या वर्षी मोशी येथील प्रशस्त इमारतीमध्ये झाले. या इमारती जवळच्या पडीक मोकळ्या जागेचा योग्य वापर करून तेथे उद्यान विकसित करण्याचा निर्णय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मिळून घेतला. त्यानुसार येथे विविध फळ झाडांसह, शोभेच्या झाडांची लागवड करण्यात आली आहे. उद्यानात सुंदर हिरवळही तयार करण्यात आली आहे. विशेष म्हणजे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील यांनी दिलेल्या प्रेरणेमुळे हे उद्यान साकारल्याची भावना मनात ठेवून कर्मचाऱ्यांनी या उद्यानाला ‘आनंदवन’ असे नाव दिले आहे.
No comments:
Post a Comment