नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारत सरकारने लोकांना कोरोनापासून बचावासाठी आरोग्य सेतू नावाचे अॅप लाँच केले होते. या अॅपला एका आठवड्यात जवळपास दोन कोटीपेक्षा अधिक लोकांनी डाउनलोड केले होते. जर आपण संशयित भागात प्रवेश केला तर या अॅपद्वारे सूचित केले जाते. हे एक लोकेशन आधारित कोरोना विषाणू ट्रॅकर अॅप आहे. या अॅपचा उपयोग ई-पास म्हणून देखील केला जाऊ शकतो.
No comments:
Post a Comment