पिंपरी, दि. 12 (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड शहराभोवती करोनाचा विळखा वाढू लागल्याने महापालिका प्रशासनाकडून कडक पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार शनिवारी (11 एप्रिल) रात्री 11 वाजल्यापासून दापोडी, कासारवाडी परिसर “सील’ करण्यात आला आहे. पुढील आदेश येईपर्यंत हा भाग “सील’ असणार आहे. तसेच शुक्रवारपासून (10 एप्रिल) भोसरीतील काही भाग सील केला आहे. पाच दिवसांपूर्वी खराळवाडी, दिघी, चिखली, थेरगाव परिसर सील केला होता. शनिवारपर्यंत पिंपरी-चिंचवडमधील सात भाग “सील’ केले आहेत.
No comments:
Post a Comment