पिंपरी, दि. 29 (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड शहरातील करोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने वायसीएम रुग्णालयातील कर्मचारी व डॉक्टर तणावात असतानाच आता पुण्यातील संशयित रुग्णांचे ओझेही वाढू लागले आहे. पुण्यातील महापालिका व शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांची मोठी गर्दी असल्याने पुणे महापालिका व खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील रुग्णांना वायसीएममध्ये पाठविले जात आहे. या प्रकारामुळे अगोदरच त्रस्त असलेल्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. या प्रकाराबाबत वरिष्ठही काहीच बोलत नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
No comments:
Post a Comment