Thursday, 21 May 2020

1 जूनपासून सुरु होणाऱ्या रेल्वेच्या ऑनलाईन तिकीट बुकिंगला आजपासून सुरुवात

नवी दिल्ली : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. 1 जूनपासून 200 प्रवासी ट्रेन सुरु होणार आहे. यासाठी आज म्हणजेच 21 मे रोजी सकाळी दहा वाजल्यापासून तिकीटाच्या बुकिंगला सुरुवात होणार आहे. ही तिकीटं ऑनलाईनच बुक करता येणार आहेत. आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर लोक तिकीट बुक करु शकतील. या रेल्वे सेवेत जनशताब्दी ट्रेन, संपर्क क्रांती, दुरांतो एक्स्प्रेस आणि इतर नियमित प्रवासी ट्रेनचा समावेश आहे. या ट्रेनमध्ये अनारक्षित डबे नसतील. 

No comments:

Post a Comment