नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेश आणि बिहारसह पाच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना राष्ट्रीय स्तरावर राशन पोर्टेबिलिटी परवानगी मिळाल्यानंतर आता देशातील १७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ‘वन नेशन, वन रेशन कार्ड’ योजना लागू झाली आहे. यासह, राष्ट्रीय व आंतरराज्यीय पोर्टेबिलिटीची सुविधा १७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील सुमारे ६० कोटी एनएफएसए लाभार्थ्यांना उपलब्ध होईल आणि त्यांना वन नेशन, वन रेशन कार्ड योजनेंतर्गत या राज्यात कोठेही रास्त भाव दुकानातून रेशन मिळवू शकता. केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालय, रामविलास पासवान यांनी शुक्रवारी उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, हिमाचल प्रदेश, दादर नगर हवेली आणि दमण आणि दीव या पाच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना वन नेशन, वन रेशन कार्ड अंतर्गत राष्ट्रीय क्लस्टरसह जोडण्यास मंजुरी दिली.
No comments:
Post a Comment