पिंपरी – तब्बल 45 दिवसांच्या लॉकडाऊननंतर तिसऱ्या लॉकडाऊनमध्ये दुकाने उघडण्यासंदर्भात केंद्र आणि राज्य शासनाने अटी शिथील केल्यानंतर दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात येत आहे. मात्र पिंपरी-चिंचवड महापालिकेने अडेलतट्टू भूमिका घेत कर भरण्याची अट टाकली होती. याबाबतचे वृत्त दैनिक प्रभातने आजच्या (शुक्रवार) अंकात प्रसिद्ध केली होते. त्यानंतर याबाबत स्थायी समितीमध्ये चर्चा झाली व ही जाचक अट रद्द करण्यात आल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष संतोष लोंढे व शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी दिली.
No comments:
Post a Comment