Wednesday, 20 May 2020

पिंपरी-चिंचवड ‘रेड झोन’मध्ये नाही मात्र कन्टेन्मेंट क्षेत्रात कडक निर्बंध

पिंपरी (प्रतिनिधी) – राज्य सरकारने चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनसाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. रेड झोन वगळता इतर झोनमध्ये नव्या नियमावलीत लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात सूट देण्यात आली अहे. या नियमावलीत पिंपरी-चिंचवड महापालिकेला रेड झोनमधून वगळण्यात आले आहे. तथापि, शहरातील कन्टेंन्मेंट क्षेत्रात मात्र कडक निर्बंध लागू असणार आहेत. त्यामुळे “थोडी खुशी, थोडा गम’ अशीच परिस्थिती शहरवासियांसाठी राहणार आहे. 22 तारखेपासून या नियमावलीनुसार शहरात अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment