Saturday, 18 August 2012

मल्टिप्लेक्स मनसे चौकट ‘मराठीचे खेळ

मल्टिप्लेक्स मनसे चौकट ‘मराठीचे खेळ: हिंदीतील सलमान खान-कतरिनाच्या बिगबजेट ‘एक था टायगर’साठी मराठी चित्रपटांचे खेळ रद्द करू नयेत, या मागणीसाठी मनसेतर्फे शहरातील सर्व मल्टिप्लेक्सचालकांना सोमवारी निवेदन देण्यात आले.

नोकरी लावण्याच्या मिषाने तरुणीची फसवणूक

नोकरी लावण्याच्या मिषाने तरुणीची फसवणूक: हिंजवडी येथील आयबीएम कंपनीत नोकरी लावून देतो, असे सांगून एका तरुणीची दहा हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

युवकांचा पुढाकार, मदतीचा ओघ अन् सव्वाशे वर्ष जुन्या तालमीचा जीर्णोद्धार

युवकांचा पुढाकार, मदतीचा ओघ अन् ...:
पिंपरी / प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वात जुन्या तालमींपैकी प्रमुख पागेच्या तालमीने १२५ वर्षांचा प्रवास पूर्ण केला असून यानिमित्ताने गावकरी व तरुण पहिलवानांनी पुढाकार घेत तालमीचा जीर्णोद्धार केला.
Read more...

अस्वस्थ आमदार, धास्तावलेले नगरसेवक ...

अस्वस्थ आमदार, धास्तावलेले नगरसेवक ...:
पिंपरी / प्रतिनिधी, मंगळवार, १४ ऑगस्ट २०१२
शहरातील अनधिकृत बांधकामे पाडण्याच्या भूमिकेवर आयुक्त ठाम राहिल्याने आणि कोणत्याही प्रकारच्या विनंती, दबावाला ते बधत नसल्याने सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षाच्या नगरसेवकांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे. आमदार विलास लांडे व लक्ष्मण जगताप यांच्या उपस्थितीत सोमवारी झालेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत आयुक्तांच्या नावाने नगरसेवकांनी थयथयाट केला.
Read more...

पिंपरी प्राधिकरणावर विभागीय ...

पिंपरी प्राधिकरणावर विभागीय ...:
मुख्यमंत्र्यांची विवंचना की राष्ट्रवादीचा दबाव ?
पिंपरी / प्रतिनिधी
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारमध्ये काँग्रेसच्या वाटणीला आलेल्या पिंपरी प्राधिकरण समितीचा घोळ न मिटल्याने विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांना पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे.
Read more...

Friday, 17 August 2012

..तर गोळ्या घालू, घरच्यांना पळवून नेऊ

..तर गोळ्या घालू, घरच्यांना पळवून नेऊ: अतुल कुलकर्णी। दि. १३ (मुंबई)

अतिक्रमण पाडाल तर गोळ्या घालू.. घरच्यांना पळवून नेऊ, अशा धमक्या.. ती पाडली नाहीत तर तुरुंगात पाठवणारा सरकारचा नवा कायदा.. त्यात कोणी उच्च न्यायालयात गेले तर आमचा आधीचा आदेशच का पाळला नाही म्हणून न्यायालय देखील गळा आवळणार.. वरिष्ठ नेते अतिक्रमण पाडा असे सांगताना त्यांचेच चेले चपाटे व १२८ नगरसेवक, लोकप्रतिनिधी धमक्यांची भाषा करतात. लोकप्रतिनिधी विरुध्द अधिकारी असा हा धुमसणारा संघर्ष कोणत्या ‘गँग ऑफ वासेपूर’ सिनेमातला नाही. मुंबईच्या जवळ पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत सध्या हे कथानक बेरंगी वळणावरुन जातानाचे चित्र आहे.

File complaints to improve services: transport utility tells commuters

File complaints to improve services: transport utility tells commuters: PMPML to organise Pravasi Din in first week of every month to hear commuters’ grievances