Thursday, 30 August 2012

टँकरमधील रसायन गळतीमुळे निगडीत धुराची 'झालर'

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32767&To=5
टँकरमधील रसायन गळतीमुळे निगडीत धुराची 'झालर'
पिंपरी, 28 ऑगस्ट
चिखलीच्या दिशेने निघालेल्या टँकरला अज्ञात वाहन जोरदार घासून निघून गेल्याने टँकरमधून रसायन गळती झाली. देहूरोड जकात नाक्याजवळ सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली. रसायन गळतीमुळे निगडी गावठाणापर्यंत धुराची धुक्यांसारखी झालर तसेच करपटलेला वास पसरला होता.

महापालिकेतील 74 मुख्य लिपिकांच्या बदल्या

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32759&To=8
महापालिकेतील 74 मुख्य लिपिकांच्या बदल्या
पिंपरी, 27 ऑगस्ट
पिंपरी-चिंचवड महापालिकेत वर्षानुवर्षे एकाच विभागात ठाण मांडून बसलेल्या 74 मुख्य लिपिकांच्या महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी आज (सोमवारी) बदल्या केल्या. यामध्ये जकात विभागातील लिपिकांची संख्या सर्वाधिक आहे. मुख्य कारकुनांच्या ’घाऊक’ बदल्यांमुळे मलईदार विभागात खुर्च्या उबविणा-या, अधिकारी, कर्मचा-यांचे धाबे दणाणले आहेत.

महापौरांसह, नगरसेविका अहमदाबादच्या 'टूर'वर ; शिवसेनेचा बहिष्कार

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32762&To=7
महापौरांसह, नगरसेविका अहमदाबादच्या 'टूर'वर ; शिवसेनेचा बहिष्कार
पिंपरी, 27 ऑगस्ट
बेकायदा बांधकामांवरील कारवाईवरुन शहरातील वातावरण चिघळले असताना महापौर मोहिनी लांडे यांच्यासह 36 नगरसेविका आज अहमदाबाद दौ-यावर गेल्या. शहरवासियांवर कारवाईची टांगती तलवार असताना अभ्यास दौ-याच्या नावाखाली विमान सहल बेजबाबदारपणाची असल्याचा आरोप करत शिवसेनेच्या नगरसेविकांनी या दौ-यावर बहिष्कार टाकला.

राजकीय पोळी भाजण्यासाठी उपमुख्यमंत्र्याना 'टार्गेट'

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32755&To=6
राजकीय पोळी भाजण्यासाठी उपमुख्यमंत्र्याना 'टार्गेट'
पिंपरी, 27 ऑगस्ट
विधान परिषदेत अनधिकृत बांधकामे पाडण्यासाठी जोर लावणारे विरोधक पिंपरी-चिंचवडमध्ये येवून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल हिटलरशाही, मोगलाईची विधाने करत आहेत. राजकीय पोळी भाजण्यासाठी विरोधकांनी उपमुख्यमंत्र्यांना टार्गेट केले असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस यशवंत भोसले यांनी आज (सोमवारी) पत्रकार परिषदेत केला. गोरगरीबांच्या घरांना हात लावा असे 'दादा' कधीही सांगत नाहीत. मात्र शहर नियोजनाच्या दृष्टीने नदी, नाले, आरक्षणांवरील अनधिकृत बांधकामांना त्यांना विरोध असल्याचेही भोसले यांनी स्पष्ट केले.

Tuesday, 28 August 2012

वायसीएममधील वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी सहकार्य

वायसीएममधील वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी सहकार्यपिंपरी - 'पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी महाराष्ट्र आयुर्विज्ञान विद्यापीठामार्फत सर्वतोपरी सहकार्य करू,'' असे आश्‍वासन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अरुण जामकर यांनी दिले. 

दापोडीमध्ये लोहमार्गाला तडे

दापोडीमध्ये लोहमार्गाला तडेपिंपरी - मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर दापोडी स्थानकादरम्यान लोहमार्गाला तडा गेला. हा प्रकार वेळीच लक्षात आल्याने मोठी दुर्घटना टळली. या प्रकारामुळे मुंबई-पुणे मार्गावरील रेल्वे वाहतूक पाऊण तास ठप्प झाली होती. रेल्वे प्रशासनाने तात्पुरती दुरुस्ती केल्यानंतर शनिवारी रात्री साडेआठ वाजता ती सुरळीत झाली. 

मुंबईहून दुचाकीवर यायचे नि सोनसाखळी चोरून पळायचे

मुंबईहून दुचाकीवर यायचे नि सोनसाखळी चोरून पळायचे: पिंपरी -&nbsp मुंबईहून दुचाकीवर पिंपरी-चिंचवड शहरात यायचे आणि सोनसाखळी हिसकवायची, असा प्रकार इराणी चोरट्यांकडून सुरू असल्याचे सांगवी पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे.