Friday, 26 October 2012

Pimpri-Chinchwad Municipal Corporation to start development works worth Rs 595 cr

Pimpri-Chinchwad Municipal Corporation to start development works worth Rs 595 cr: The Pimpri-Chinchwad Municipal Corporation has decided to commission over 1,400 development works in various wards soon.The estimated cost of the works is in the range of Rs 594.71 crore.

पुढच्यास ठेच, तरी मागच्यांचा ‘वेडेपणा’

पुढच्यास ठेच, तरी मागच्यांचा ‘वेडेपणा’: पुण्यातील बीआरटी सेवा अयशस्वी ठरल्याचे उदाहरण डोळ्यासमोर असताना पिंपरी चिंचवड महापालिकेने याच बीआरटीच्या रस्तारुंदीकरणासाठी तब्बल १९९१ झाडांवर पाणी सोडले आहे. रुंदीकरणासाठी ‘डिफेन्स इस्टेट डिपार्टमेंट’ची जागा विकत घेताना वृक्षसंवर्धनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून या मार्गावरील दोन हजार झाडे तोडण्यास महापालिकेने लष्कराला परवानगी दिली आहे.

फर्मला दोन कोटी रुपयांना गंडवले

फर्मला दोन कोटी रुपयांना गंडवले: ‘बॅँक ऑफ महाराष्ट्र’ने पिंपरी ‘एमआयडीसी’मधील एक प्लॉट जप्त केल्याचे खोटेच सांगून तो स्वस्तात सोडवून देण्याच्या आमिषाने पाच ठगांनी एका फर्मला दोन कोटी रुपयांना गंडवल्याचे उघडकीस आले आहे.

सभापतींची तारीख पे तारीख..

सभापतींची तारीख पे तारीख..: पिंपरी । दि. २४ (प्रतिनिधी)

मागासवर्गासाठी आरक्षित जागेवर निवडणूक लढण्याकरिता स्थायी समिती सभापती जगदीश शेट्टी व बंधू उल्हास शेट्टी यांनी बनावट जात प्रमाणपत्र दाखल केले असल्याच्या आक्षेपाचा मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल आहे. त्यांच्या काही प्रतिस्पध्र्यांनी पिंपरी आणि जिल्हा न्यायालयातही धाव घेतली आहे. वेळोवळी न्यायालयात तारखांना हजर राहावे लागत असल्याने स्थायी समिती सभांना सभापतींना हजर राहता येत नाही. तारीख पे तारीखमुळे सभा तहकूब होऊ लागल्या आहेत.

जात प्रमाणपत्राबाबतच्या याचिकेमुळे शेट्टी बंधू अडचणीत आले आहेत. त्यांच्या मागे पोलीस आणि न्यायालयाचा ससेमिरा लागला आहे. विद्यानगर येथील राम पात्रे यांनी याबाबत उच्च न्यायालयात, तर अजंठानगर प्रभागातील शेट्टी यांचे प्रतिस्पर्धी भीमा बोबडे यांनी पिंपरी न्यायालयात दावा दाखल केला आहे. मागील महिन्यात या दाव्याची सुनावणी झाली. त्यात शेट्टी बंधूंसह महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या विरोधात गुन्हे दाखल करून अहवाल सादर करण्याचा आदेश न्यायालयाने पोलिसांना दिला होता. महापालिका अधिकार्‍यांनी याप्रकरणी त्यांचे म्हणणे सादर केल्याने त्यांच्यावरील कारवाईस तात्पुरती स्थगिती मिळाली. शेट्टी बंधूंना मात्र न्यायालयात हेलपाटे मारावे लागत आहेत. ऑक्टोबर महिन्यातील स्थायी समितीच्या साप्ताहिक सभा वारंवार तहकूब करण्याची वेळ आली आहे.

ऑक्टोबरची पहिलीच सभा गांधी जयंतीच्या सुटीमुळे झालीच नाही. त्यानंतर दि. ९ आणि १६ च्या सभांना सभापतींनी दांडी मारली. या तहकूब सभा गुरुवारी दि. १८ ला घेण्याचे निश्‍चित झाले. परंतु तीही ऐनवेळी तहकूब करावी लागली. दि. २३ ची साप्ताहिक सभाही पुढे ढकलण्यात आली. सभापतींच्या अनुपस्थितीमुळे कामकाजावर परिणाम होत आहे.

शेट्टींच्या चकरा

शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी ऐन निवडणूक काळात विभागीय जात पडताळणी समितीकडे शेट्टी यांच्या जात प्रमाणपत्राबाबत तक्रार नोंदवली आहे. बनावट जातप्रमाणपत्र असल्याचा आक्षेप त्यांनी नोंदवला असून, त्याचा पाठपुरावा सुरू आहे. जातपडताळणी समितीकडेही शेट्टी बंधूंना चकरा माराव्या लागत आहेत. दि. २९ रोजी पुणे विभागीय जात पडताळणी समितीपुढे शेट्टी यांची सुनावणी होणार आहे.

गॅस एजन्सी मनमानीला जिल्हाधिकार्‍यांची चपराक

गॅस एजन्सी मनमानीला जिल्हाधिकार्‍यांची चपराक: पुणे। दि. २३ ( प्रतिनिधी)

नवीन गॅस कनेक्शन घेताना मनमानी दर लावणे, त्याचसोबत गृहोपयोगी वस्तू घेणे बंधनकारक करणे, गॅस सिलिंडरसाठी अधिकचे पैसे घेणे, अशा गॅस एजन्सीच्या मनमानीला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. यासाठी प्रत्येक गॅस एजन्सीच्या बाहेर गॅस सिलिंडरचे दर, नवीन गॅस कनेक्शनसाठी लागणारे पैसे याबाबतचे सविस्तर दरपत्रक लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

केंद्र सरकारने घरगुती ग्राहकांना वर्षाला सहाच सिलिंडर सवलतीच्या दरात मिळणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या निर्णयाच्या पार्श्‍वभूमीवर नवीन गॅस कनेक्शन देताना एजन्सी दुप्पट पैसे उकळत आहेत, तर काही एजन्सी तेलाचा डबा, तांदूळ, भांडी, अशा वस्तू घेण्याचा आग्रह करतात. घरपोच सिलिंडर देत नाहीत, तक्रारीसाठी फोन केल्यास फोन उचलत नाहीत, अशा अनेक तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे करण्यात आल्या होत्या. गेल्या काही दिवसांत या तक्रारींमध्ये मोठी वाढ झाली आहे. यामुळे शहर आणि जिल्ह्यातील सर्व गॅस एजन्सीला दर्शनी भागावर प्रत्येक गोष्टीचे दरपत्रक लावण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत. तसेच अशा प्रकारे ग्राहकांची पिळवणूक केल्यास कारवाई करण्याची तंबी दिली आहे.

Of 5,000 bus stops, only 200 are in good shape, PMPML promises action

Of 5,000 bus stops, only 200 are in good shape, PMPML promises action: A day after a shed at a bus stop close to PMC headquarters in Shivajingar crashed barely three minutes after around 50 commuters had left the stop by two buses, the Newsline team found out that many bus stops in the city and Pimpri-Chinchwad are in a very bad shape.

After it okays Metro route, PCMC tells PMC to put project

After it okays Metro route, PCMC tells PMC to put project: After approving the Metro rail proposal for Swargate to Pimpri-Chinchwad route in its jurisdiction, the Pimpri-Chinchwad Municipal Corporation has now urged the Pune Municipal Corporation (PMC) to give its nod to the route in its area and send the proposal to the state government.