Tuesday, 27 November 2012

विमानतळ चांदूस-कोरेगावातच

विमानतळ चांदूस-कोरेगावातच: आसखेड। दि. २६ (वार्ताहर)

प्रस्तावित विमानतळ नियोजित (चांदुस—कोरेगाव) या जागेतच होणार असून, बाधित शेतकर्‍यांना विश्‍वासात घेऊन योग्य भाव आणि अडचणीवर योग्य मार्ग काढीत निर्णय घेतला जाणार आहे, असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी करंजविहिरे (ता. खेड) येथील विश्रामगृहात औपचारिक बैठकीत केले.

दरम्यान, आळंदी येथील अतिक्रमण, विमानतळविरोधी समितीचे भामचंद्र डोंगर परिसर आरक्षणबाधित शेतकरी आदींची निवेदने व त्यावर चर्चा करण्यात आली. त्यानंतर करंजविहिरे—तळशेत—धामणे—पाईट आदी गावांना जोडणार्‍या पुलाचे उद्घाटन अजितदादा पवार, पुण्याचे पालकमंत्री सचिन अहिर यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी विमानतळाविषयीच्या झालेल्या निर्णयाबाबत बाधित शेतकर्‍यांना योग्य माहिती देण्याच्या सूचना प्रांताधिकारी सुनील थोरवे यांना पवार यांनी दिल्या. भामा नदीच्या पुलाच्या उद्घाटनप्रसंगी आमदार दिलीपराव मोहिते—पाटील, जिल्हाध्यक्ष सुरेश घुले, जिल्हा परिषद अध्यक्ष दत्तात्रय भरणे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप कंद आदी उपस्थित होते.

आठ महिन्यात 176 कोटींचा खर्च 493 कोटी शिल्लक !

आठ महिन्यात 176 कोटींचा खर्च 493 कोटी शिल्लक !
पिंपरी, 26 नोव्हेंबर
महापालिका प्रशासनाने चालू आर्थिक वर्षातील पहिल्या आठ महिन्यात भांडवली कामांवर केवळ 176 कोटी रुपयांचा खर्च केला आहे. त्यामुळे स्थापत्य विभागासह विद्युत, पाणीपुरवठा, जलनिःस्सारण, भुयारी गटार, प अंदाजपत्रक आणि वैद्यकीय विभागासाठी 669 कोटी रुपयांची विक्रमी तरतूद असताना महापालिका कोषागारात आज अखेरीस 493 कोटी रुपये अक्षरश: पडून आहेत.
www.mypimprichinchwad.com

जकात समानीकरणाच्या प्रस्तावावरुन महापालिका सभेत गदारोळ

जकात समानीकरणाच्या प्रस्तावावरुन महापालिका सभेत गदारोळ
पिंपरी, 26 नोव्हेंबर
जकात समानीकरणाच्या प्रस्तावावरुन पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सभेत आज (सोमवारी) गदारोळ झाला. समानीकरणामुळे जकात उत्पन्नाला 190 कोटींचा फटका बसणार असल्याने शिवसेना आणि मनसेने या प्रस्तावाला जोरदार विरोध केला. मात्र महापौर मोहिनी लांडे यांनी त्याची दखल न घेत सभा रेटून नेण्याचा प्रयत्न केल्याने शिवसेना आणि मनसेच्या सदस्यांनी महापौरांच्या आसनासमोर धाव घेत गोंधळ घातला. घोषणाबाजी करत कामकाज रोखण्याचाही प्रयत्न केला. परंतु, ही संधी साधून सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने उपसूचना घुसडत तब्बल 26 प्रस्ताव अवघ्या दहा मिनिटांत मंजूर करुन टाकले. अनधिकृत बांधकामांना सोई-सुविधा पुरविण्याचा प्रस्ताव तहकूब ठेवण्यात आला.
www.mypimprichinchwad.com

सासुरवाडीच्या छळाला कंटाळून जावयाची आत्महत्या

सासुरवाडीच्या छळाला कंटाळून जावयाची आत्महत्या
पिंपरी, 26 नोव्हेंबर
सासुरवाडीतील सततच्या छळाला कंटाळून प्रेमविवाहानंतर अवघ्या चारच महिन्यांत जावयाने राहत्या घरात गळफास लावून जीवनयात्रा संपविली. या प्रकरणी मृत युवकाची पत्नी, सासू, सासरे यांच्याविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कौटुंबिक कलहातून आत्महत्या केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. ही घटना आज सकाळी सहा वाजता पिंपरीच्या इंदिरानगर झोपडपट्टीत घडली
www.mypimprichinchwad.com

पीएमपीच्या 4913 पैकी 4029 थांब्यांवर शेडच नाही

पीएमपीच्या 4913 पैकी 4029 थांब्यांवर शेडच नाही
पिंपरी, 26 नोव्हेंबर
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएल) 4913 पैकी अवघ्या 4029 थांब्यांवर शेडच नाहीत. तर 3263 थांब्यांवर नावाची पाटी नसल्याची माहिती पुढे आली आहे. सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल विनोद यांनी माहिती अधिकारांतर्गत ही माहिती मागविली होती.
पीएमपीएमएलच्या बसथांब्यांच्या सद्यस्थितीविषयीची माहिती विठ्ठल विनोद यांनी मागितली होती. पीएमपीएलने दिलेल्या माहितीनुसार पुणे शहर, पिंपरी-चिंचवडजवळील उपनगरे मिळून चार हजार 913 थांबे आहेत. त्यापैकी 884 थांब्यांवर बसशेड आहेत. तर 1650 थांब्यांवर मार्गदर्शक फलक उभारण्यात आले आहेत.
www.mypimprichinchwad.com

बॉम्बचे विविध प्रकार पाहून पिंपरी-चिंचवडकर चकित

बॉम्बचे विविध प्रकार पाहून पिंपरी-चिंचवडकर चकित
पिंपरी, 26 नोव्हेंबर
बॉम्बस्फोट, दहशतवादी हल्ला, आतंकवाद्याशी पोलिसांचा लढा या शब्दांपलिकडे नागरिकांना काहीच 'खबर' नसते. मात्र मुंबईत 26/11 या दहशतवादी हल्ल्याला चार वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर बॉम्ब व बॉम्बसदृश्य वस्तू कशा प्रकारच्या असतात. बॉम्ब कसा असतो, त्याचा शोध कसा घेतला जातो, हे कुतुहलाने पाहाण्याचा दुर्मिळ योग पिंपरी-चिंचवड शहरवासियांनी आज अनुभवला. 'त्या' वस्तू शोधून 'बीडीडीएस' कडून बॉम्ब निकामी करण्यासाठी वापरण्यात येणारी उपकरणे कशी असतात हे पाहण्याची संधी शहरवासियांनी मिळाली.
www.mypimprichinchwad.com

Woman's bag containing cash, gold snatched in Pimpri

Woman's bag containing cash, gold snatched in Pimpri: A motorcycle-borne youth snatched a purse containing cash and gold ornaments from a 46-year-old woman at Pimpri on Saturday morning. The worth of the stolen booty is Rs 1.74 lakh.