विमानतळ चांदूस-कोरेगावातच: आसखेड। दि. २६ (वार्ताहर)
प्रस्तावित विमानतळ नियोजित (चांदुस—कोरेगाव) या जागेतच होणार असून, बाधित शेतकर्यांना विश्वासात घेऊन योग्य भाव आणि अडचणीवर योग्य मार्ग काढीत निर्णय घेतला जाणार आहे, असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी करंजविहिरे (ता. खेड) येथील विश्रामगृहात औपचारिक बैठकीत केले.
दरम्यान, आळंदी येथील अतिक्रमण, विमानतळविरोधी समितीचे भामचंद्र डोंगर परिसर आरक्षणबाधित शेतकरी आदींची निवेदने व त्यावर चर्चा करण्यात आली. त्यानंतर करंजविहिरे—तळशेत—धामणे—पाईट आदी गावांना जोडणार्या पुलाचे उद्घाटन अजितदादा पवार, पुण्याचे पालकमंत्री सचिन अहिर यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी विमानतळाविषयीच्या झालेल्या निर्णयाबाबत बाधित शेतकर्यांना योग्य माहिती देण्याच्या सूचना प्रांताधिकारी सुनील थोरवे यांना पवार यांनी दिल्या. भामा नदीच्या पुलाच्या उद्घाटनप्रसंगी आमदार दिलीपराव मोहिते—पाटील, जिल्हाध्यक्ष सुरेश घुले, जिल्हा परिषद अध्यक्ष दत्तात्रय भरणे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप कंद आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment