Sunday, 9 December 2012

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा पिंपरी चौकात जल्लोष

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा पिंपरी चौकात जल्लोष
पिंपरी, 7 डिसेंबर
अजित पवार यांनी आज सकाळी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी पिंपरी चौकात फटाके वाजवत व मिठाई वाटप करीत आनंद व्यक्त केला.
www.mypimprichinchwad.com

एकाच विचाराने काम करणे हीच राष्ट्रीय एकात्मता- अभ्यंकर

एकाच विचाराने काम करणे हीच राष्ट्रीय एकात्मता- अभ्यंकर
पिंपरी, 7 डिसेंबर
राष्ट्र उभारणीचे काम करण्यासाठी एक विचार असणे आवश्यक आहे. विचार एकच असेल पण कृती भिन्न असेल तर कुणीही आक्षेप घेण्याचे कारण नाही. पण सर्वांनी एकाच विचाराने काम करणे गरजेचे आहे. त्यातच खरी राष्ट्रीय एकात्मता आहे असे मत ज्ञानप्रबोधिनीचे संचालक प्रा.वा. ना. अभ्यंकर यांनी व्यक्त केले.
www.mypimprichinchwad.com

मेट्रो ट्रॅकवर!

मेट्रो ट्रॅकवर!: पिंपरी ते स्वारगेटचा पहिला टप्पा १६ किलोमीटरचा
पुणे। दि. ६ (प्रतिनिधी)

गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट मेट्रो मार्गाचा पहिला टप्पा राबविण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे आला आहे. साधारण १६ किलोमीटरचा हा मार्ग पिंपरीत इलेव्हेटेड व पुणे हद्दीत काही ठिकाणी भुयारी असणार आहे. पुणे मेट्रो रेल कार्पोरेशन व स्पेशल परपज व्हीकल या कंपनीची स्थापन करून अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकांच्या हद्दीतून जाणार्‍या मेट्रो मार्गाचा अहवाल दिल्ली मेट्रो रेल कार्पोरेशनने (डीएमआरसी) चार वर्षांपूर्वी तयार केला होता. त्या वेळी पहिल्या टप्प्यात पिंपरी-स्वारगेट आणि दुसर्‍या टप्प्यात वनाझ ते रामवाडी असे मार्ग प्रस्तावित करण्यात आले होते. केंद्र व राज्य शासन प्रत्येकी २0 टक्के, महापालिका १0 टक्के आणि उर्वरित ५0 टक्के खर्च ‘बीओटी’ अथवा ‘पीपीपी’द्वारे कर्जाऊ घेऊन विकसित करण्यात येणार होता. त्यापैकी पुणे महापालिकेच्या हद्दीतून जाणार्‍या दुसर्‍या टप्प्याला महापालिका व राज्य शासनाचीही मान्यता मिळाली आहे. परंतु, पहिल्या टप्प्यातील १६ किलोमीटरच्या मार्गावरून दोन्ही महापालिकांचे एकमत होत नसल्याने हा प्रस्ताव रखडला होता.

अखेर पिंपरी महापालिकेच्या हद्दीतून जाणारा ७.१५ किलोमीटरचा मार्ग व ६ स्थानकांचा खर्च महापालिकेने उचलण्याची तयारी दर्शवून मान्यताही दिली. उर्वरित ९.४४ किलोमीटरचा रस्ता पुणे महापालिका हद्दीतून जाणार असून, त्यापैकी ४.६६ किमीचा भुयारी मार्ग राहणार आहे. इलेव्हेटेड मार्गावर ३ आणि भुयारी मार्गावर ४ स्थानके उभारण्यात येणार आहेत. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी पुणे रेल कार्पोरेशन व एसपीव्ही या कंपनीतर्फे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. भूसंपादन, मोबदला देणे, जमीन हस्तांतरण, कर्ज उभारणी व प्रकल्पाचे नियोजन डीएमआरसीच्या सल्ल्यानुसार करण्यात येणार आहे. भुयारी मार्गासाठी तीनपट अधिकचा खर्च येणार असल्याचे प्रस्तावात म्हटले आहे.

मेट्रो दूर; मात्र खर्च सव्वीसशे कोटींनी वाढला

मेट्रो दूर; मात्र खर्च सव्वीसशे कोटींनी वाढला:
M_Id_148695_Metro
पुण्याचा मेट्रो प्रकल्प केव्हा सुरू होईल आणि मेट्रो कधी धावायला लागेल याबाबत पूर्णत: अनिश्चितता असली, तरी मेट्रोच्या दोन प्रस्तावित मार्गाचा खर्च मात्र तब्बल दोन हजार ६३१ कोटींनी वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. मेट्रोचा खर्च आता १० हजार ५७७ कोटींवर गेला असून खर्चाचा हा आकडा मेट्रो २०१४ पर्यंत सुरू झाली तरचा आहे. प्रकल्प आणखी लांबल्यास खर्चात आणखी वाढ होईल.
मेट्रोच्या स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड या मार्गाच्या आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी, निधी उभारणीबाबत निर्णय घेण्यासाठी आणि प्रकल्प राबविण्यासाठी आयुक्तांना सर्वाधिकार द्यावेत, असा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडून स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. या प्रस्तावात मेट्रोच्या खर्चात वाढ झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. मेट्रोचा प्रस्तावित खर्च आणि खर्चात झालेली वाढ यातील अंतर भरून काढण्यासाठी आर्थिक उपाययोजना करणे व त्याचे निर्णय घेणे, तसेच मेट्रोसाठी स्वतंत्र कंपनी स्थापन होईपर्यंत कार्यवाही करणे यासाठीही आयुक्तांना अधिकार देण्यासंबंधीचा हा प्रस्ताव आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंवचडमधील संयुक्त मेट्रो प्रकल्प सन २००९ पासून चर्चेत आहे आणि त्यातील वनाझ ते रामवाडी या एकाच मार्गाला आतापर्यंत राज्य शासनाकडून तत्वत: मंजुरी मिळाली आहे. दुसरा मार्ग पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट असा आहे. मेट्रोचा प्रकल्प अहवाल दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने सन २००९ मध्ये तयार केलेला असून वनाझ ते रामवाडी या मार्गासाठी १,९४८ कोटी रुपये खर्च त्यावेळी अपेक्षित होता. हा मार्ग २०१४ पर्यंत पूर्ण झाल्यास या मार्गासाठी २,५९३ कोटी इतका खर्च येईल, तर स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड या मार्गासाठी ५,९९८ कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित होता. तो आता ७,९८४ कोटी इतका वाढेल. या दोन्ही मार्गाची एकूण लांबी ३१.५१ किलोमीटर इतकी असून पुणे आणि पिंपरी महापालिकांनी आपापल्या हद्दीतील मार्गाचा खर्च करायचा आहे. एकूण खर्चाच्या प्रत्येकी २० टक्के रक्कम केंद्र व राज्य शासनाकडून मिळणार आहे, तर दहा टक्के रक्कम महापालिकेने द्यायची आहे. उर्वरित ५० टक्के रक्कम कोणत्या माध्यमातून उभी करायची यासंबंधी वेगवेगळे पर्याय समोर आले आहेत. त्यात मुख्यत: पब्लिक प्रायव्हेट पार्टिसिपेशन (पीपीपी) किंवा खासगीकरण किंवा बीओटी आदी पर्यायांची चर्चा आहे.
 सहा भुयारी स्थानके
स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड हा मार्ग १६.५१९ किलोमीटर इतक्या लांबीचा असून वनाझ ते रामवाडी हा मार्ग १५ किलोमीटर लांबीचा आहे. त्यातील स्वारगेट ते िपपरी या मार्गात १५ स्थानके आहेत. त्यातील सहा स्थानके पिंपरीच्या हद्दीत आहेत आणि ती सर्व उन्नत मार्गावरील (इलेव्हेटेड) आहेत. पुणे महापालिका हद्दीत दोन आणि खडकी कॅन्टोन्मेंट हद्दीत एक इलेव्हेटेड स्थानके असून उर्वरित सहा स्थानके भुयारी आहेत आणि ती पुणे महापालिका हद्दीतील आहेत. यातील पिंपरी महापालिका हद्दीत पूल, उड्डणपूल, ग्रेड सेपरेटर यांची संख्या अधिक असल्याने तेथील तांत्रिक बदलांसाठी अधिक खर्च येणार असल्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.   

पिंपरीतील कत्तलखाना बंद करण्याचा महापालिकेचा निर्णय

पिंपरीतील कत्तलखाना बंद करण्याचा महापालिकेचा निर्णय:
जवळपास २० वर्षांपेक्षा अधिक काळापासून िपपरी रेल्वे उड्डाणपुलाखाली सुरू असलेला कत्तलखाना बंद करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. याबाबतची माहिती संबंधित व्यावसायिक व पोलीस यंत्रणेलाही कळवण्यात आली आहे.
मागील काही वर्षांपासून िपपरीतील कत्तलखाना बंद करण्याची मागणी होत आहे. गेल्या काही महिन्यांपासून ही मागणी जोर धरू लागली होती. मातृभूमी दक्षता चळवळ या संघटनेने महापालिकेच्या विरोधात आंदोलन केले होते. २९ नोव्हेंबरला गोवंश रक्षा समितीच्या पुढाकाराने या मागणीसाठी सर्वपक्षीय महामोर्चा काढला. खासदार गजानन बाबर, जिल्हाप्रमुख उमेश चांदगुडे, भाजपचे शहराध्यक्ष एकनाथ पवार, अमर साबळे, माजी महापौर संजोग वाघेरे, बांधकाम व्यावसायिक संदीप वाघेरे, मिलिंद एकबोटे, डॉ. कल्याण गंगवाल व मोठय़ा संख्येने नागरिक त्यामध्ये सहभागी झाले होते. मोर्चातील शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेतली असता याबाबतची सर्व माहिती घेऊ व आठ दिवसात निर्णय घेऊ, असे आश्वासन आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी दिले होते. त्यानंतर, भरवस्तीत असलेल्या कत्तलखान्यास असलेला विरोध लक्षात घेऊन आयुक्तांनी हा कत्तलखाना बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते.   

PMC, PCMC blamed for poor dengue awareness

PMC, PCMC blamed for poor dengue awareness: The Union health ministry's team that carried out larval survey in the dengue affected areas of Pune and Pimpri-Chinchwad observed that both the civic bodies failed in carrying out adequate health education activities among their citizens about how to tackle the breeding sites of aedes aegypti mosquito, the dengue vector.

Friday, 7 December 2012

Health camps for physically challenged

Health camps for physically challenged: Lions Club International will organise various health camps for the physically challenged on December 12 and 13 at Nehru Nagar in Pimpri and December 14 to December 16 at Oswal Bandhu Samaj Karalaya, Hotel Seven Love Chowk, Pune.