Tuesday, 18 June 2013

भोसरी पोटनिवडणुकीच्या लढतीचे ...

भोसरी पोटनिवडणुकीच्या लढतीचे ...:
न्यायप्रविष्ठ बाबीमुळे भोसरी पोटनिवडणुकीबाबत संभ्रमावस्था असली तरी आज अखेरीस पाच उमेदवारी अर्ज विक्रीस गेले आहेत. अर्ज दाखल करण्यासाठी उद्या (मंगळवारी) दुपारी तीन पर्यंतची वेळ आहे. त्यानंतर लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

पीएमपी चालकाला रिक्षा चालकाकडून ...

पीएमपी चालकाला रिक्षा चालकाकडून ...:
किरकोळ कारणावरून एका पीएमपीएमएल बसच्या चालकाला एका रिक्षा चालकाने शिवीगाळ व मारहाण केल्याचा प्रकार शनिवारी (दि. 15) नाशिक फाटा येथे घडला.

पिंपरी-चिंचवडमधील 22 भाविक ...

पिंपरी-चिंचवडमधील 22 भाविक ...:
पिंपरी-चिंचवडमधील 22 भाविक उत्तरकाशीत अडकले, सुटकेसाठी प्रयत्न सुरू
उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील डोंगराळ भागात शनिवारी झालेल्या ढगफुटीच्या निसर्ग प्रकोपात पिंपरी-चिंचवडमधील आर्ट ऑफ लिव्हिंगचे 22 साधक अडकून पडले आहेत. उत्तरकाशीपासून 14 किलोमीटर अंतरावर ओंगी मणेरी या गावाजवळ हे सर्व यात्रेकरू अडकले आहेत.
Read more...

परीक्षेतील गुणांपेक्षा गुणवत्ता महत्त्वाची - डॉ. श्रीकर परदेशी

परीक्षेतील गुणांपेक्षा गुणवत्ता महत्त्वाची - डॉ. श्रीकर परदेशी: लेखी परीक्षेतील गुणांपेक्षा कौशल्यावर आधारित गुणवत्ता महत्त्वाची आहे, त्यादृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे मत पालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी व्यक्त केले.

खाद्यपदार्थांवर घोंघावतात माशा

खाद्यपदार्थांवर घोंघावतात माशा: (प्रवीण बिडवे )

पिंपरी - कळकटलेल्या भिंती, वर्षानुवर्षे साफसफाई होत नाही याची साक्ष देणारी जळमटे, किळस यावी अशी पाणपोईजवळची दुर्गंधी आणि खाद्यपदार्थांभोवतीच नव्हे, तर तेथील माणसांभोवती देखील घोंघावणार्‍या माशा ही परिस्थिती आहे, वल्लभनगर एसटी आगाराच्या स्नॅक्स बारची. परमेश्‍वराचे भजन आणि भोजन पडद्याआड करावे, ही आपली संस्कृती. पण येथे स्नॅक्स बारमधील गलिच्छपणा लपविण्यासाठी बसविलेले पडदेही काळेकुट्टपणामुळे मूळ रंग हरवून बसले आहेत. पडद्याआडच्या गलिच्छ वातावरणात बनतात खाद्यपदार्थ आणि स्वत:च्या स्वच्छतेबाबतही तितकेच उदासीन असलेल्या विक्रेत्यांकडून ते खाऊ घातले जातात प्रवाशांना. प्रवाशांच्या आरोग्याशी सुरू असलेला हा खेळ थांबणे आवश्यक आहे.

अकरावी प्रवेशाच्या 16 हजार अर्जांची विक्री

अकरावी प्रवेशाच्या 16 हजार अर्जांची विक्री

पिंपरी - फत्तेचंद जैन महाविद्यालय आणि पिंपरीतील महात्मा फुले महाविद्यालयातून अकरावी प्रवेशासाठी 16 हजार 828 अर्जांची सोमवारपर्यंत विक्री झाली, अशी माहिती प्राचार्य एच.

शाळांमार्फत विद्यार्थ्यांना मोफत पीएमपीचे पास

शाळांमार्फत विद्यार्थ्यांना मोफत पीएमपीचे पास

पुणे - शहर आणि पिंपरी चिंचवडमधील पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पीएमपीच्या मोफत बस प्रवास योजनेचे पास मिळण्याची प्रक्रिया उद्यापासून (मंगळवार) सुरू होणार आहे.