Monday, 23 December 2013

लग्नसराईमुळे फुले तेजीत

पिंपरी : पिंपरी कॅम्पातील भाजी मंडईत टोमॅटोची आवक वाढल्याने टोमॅटोचे दर प्रती किलोमागे पाच ते दहा रुपयांनी घटले. आवक घटल्याने राजमा, मिरची महागली. तर लग्नसराईमुळे गुलछडी, गजरा, गुलाब या फुलांच्या किंमतीत मोठी वाढ झाली. 
पुण्यातील गुलटेकडी मार्केट यार्ड व ग्रामीण भागातून टोमॅटोची आवक वाढली. यामुळे टोमॅटो ३0 रुपयांवरून २0 रुपये प्रती किलोवर आला. आवक घटल्याने राजमा, आले, मिरची यांच्या दरात पाच ते दहा रुपयांपर्यंत वाढ झाली. कांदा, बटाटा, कारले, गाजर वांगी, गवार यांचे भाव स्थिर राहिले. तर फ्लॉवर, भेंडी, लसूण यांचे भाव घसरले आहेत. 

मोकाट कुत्र्यांचा चाकण मध्ये हैदोस

पिसाळलेल्या कुत्र्याचा अनेकांना चावा
चाकण शहरातील लहान मुलं आणि त्यांचे पालक आणि सामान्य नागरिक सध्या कुत्र्याच्या दहशतीखाली वावरत आहेत. कारण गेल्या दोन दिवसांपासून अनेकांना काही मोकाट पिसाळलेल्या कुत्र्यांनी अनेकांना चावा घेतलाय. ग्रामपंचायत प्रशासन मात्र काहीच पावलं

Sunday, 22 December 2013

CM promises to regularise illegal structures, PCMC chief says demolition drive will go on

Municipal Commissioner Shrikar Pardeshi Saturday said his administration would continue with the demolition drive till the new Act comes into force.

MSRTC to start new terminus at Sangvi

Pune division of the Maharashtra State Road Transport Corporation (MSRTC) is expected to start operations of buses from newly proposed mini-terminus in Sangvi area from next month.

शहरात 39 फ्लेक्सवर कारवाई; 19 हजारांचा दंड वसूल

महापालिका कार्यक्षेत्रात विनापरवाना फ्लेक्स लावणा-यांवर कारवाईचा बडगा उगारीत पिंपरी महापालिका प्रभाग अधिका-यांनी तबब्ल 39 फ्लेक्सवर कारवाई केली. फ्लेक्स धारकांकडून 19 हजार 220 रुपयांचा दंड वसूल केला आहे. विशेष म्हणजे, सर्वाधिक कारवाई करण्यात आलेल्या क आणि ड प्रभागातील संबंधित फ्लेक्स धारकांकडून एकही रुपयांचा दंड किंवा

शहर फेरीवाला समितीची स्थापना

अध्यक्षपदी महापालिका आयुक्त डॉ. परदेशी 
शासनाच्या राष्ट्रीय फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीसाठी शहर फेरीवाला समितीची स्थापना करण्यात येणार असून महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी हे त्या समितीच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत.

आरटीओच्या नवीन इमारतीसाठी आणखी वर्षभर प्रतिक्षा

पिंपरी-चिंचवडच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) नवीन इमारतीचे काम मोशी प्राधिकरणामध्ये सुरू आहे. परंतु, ही सुसज्ज इमारत पूर्णत्वास येण्यासाठी आणखी एक वर्षापेक्षा जास्त कालावधी लागणार आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांनी दिली. चालु अर्थिक वर्षात सुमारे 220 कोटींचा महसूल या विभागाने गोळा