Thursday, 9 January 2014

पिंपरीमध्ये दारूभट्ट्या उद्‍‍ध्वस्त

पिंपरीतील भाटनगरमध्ये रेल्वेमार्गाशेजारी असलेल्या झोपड्यांमध्ये सुरू असलेला अवैध दारूचा धंदा उत्पादन शुल्क अधिकारी (एक्साइज) पथकाने मंगळवारी (७ जानेवारी) छापा टाकून उद्‍‍ध्वस्त केला. या वेळी लागलेल्या आगीमुळे झालेल्या स्फोटात उत्पादन शुल्क विभागाचे चार कर्मचारी आणि दोन स्थानिक रहिवासी भाजले असून, एकाची प्रकृती गंभीर आहे.

मीटर कॅलिब्रेशन नसलेल्या रिक्षांवर कारवाई होणार

रिक्षाची भाढेवाढ झाल्यानंतर इलेक्ट्रॉनिक मीटरमध्ये करण्यात येणारे बदल (कॅलिब्रेशन) करून घेण्यास देण्यात आलेली शेवटची मुदत शुक्रवारी संपणार आहे.

आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पिंपरीत उद्घाटने उरकण्याची लगीनघाई

लोकसभा निवडणुका जवळ आल्याने महापालिकेच्या माध्यमातून झालेल्या विकासकामांचे श्रेय घेण्यासाठी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली आहे.

पासपोर्ट आता एजंटमुक्त

पुणे -&nbsp पासपोर्ट सुविधा केंद्रांना (पीएसके) एजंटांच्या विळख्यातून सोडविण्यासाठी "ऑनलाइन' अर्ज भरण्याची सुविधा पुरविणारी स्वतंत्र यंत्रणा देशात उभारण्यात येणार आहे.

औद्योगिक मंदीमुळे शासनाने सवलती द्याव्यात

पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीतील मंदीच्या लाटेमुळे त्रस्त झालेल्या लघुउद्योजक तसेच कामगारांना दिलासा मिळावा, यासाठी शासनाने देशातीलच वाहन कंपन्यांची वाहने वापरणे सक्तीचे करावे. तसेच सर्वसामान्यांना अन्नधान्यांपासून शिक्षणापर्यंत सर्व क्षेत्रात सवलती द्याव्यात, अशी मागणी पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेने केली आहे.
Fact-2

भोसरीतील जिजाऊ व्याख्यानमालेस शुक्रवारी (दि. 10) प्रारंभ

भोजापूर सार्वजनिक वाचनालय आणि ग्रंथालयातर्फे आयोजित राजमाता जिजाऊ व्याख्यानमालेस येत्या शुक्रवारी (दि. 10) प्रारंभ होणार आहे. तीन दिवस चालणा-या रोज सायंकाळी 6 वाजता सुरू होणा-या या व्याख्यानमालेच्या निमित्ताने वैचारीक मेजवानीच भोसरीवासियांना मिळणार आहे. दरम्यान, दरवर्षी देण्यात येणारा 'राजमाता जिजाऊ पुरस्कार' यंदा पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या

भाजपात सुमारे 500 जणांचा प्रवेश

भारतीय जनता पक्षाच्या भोसरी विधानसभा मतदारसंघातील बुथ कार्यकर्त्यांसाठी आयोजित 'युवा गर्जना' या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सुमारे 500 जणांनी भाजपामध्ये प्रवेश केला असल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख एकनाथ पवार यांनी दिली.