Thursday, 12 June 2014

लडाख येथील निसर्गचित्रांचे १३ जूनपासून चिंचवडमध्ये प्रदर्शन

देवदत्त कशाळीकर यांनी लडाख येथील निसर्गसौंदर्य कॅमेऱ्यात बंदिस्त केले आहे. त्यातील निवडक प्रकाशचित्रांचे प्रदर्शन १३ ते १६ जून दरम्यान चिंचवड येथे भरवण्यात आले आहे.

डॉ. घारे यांना आदरांजली

पिंपरी-चिंचवड नगरपालिकेचे पहिले नगराध्यक्ष कै. डॉ. श्री घारे यांच्या 95 व्या जयंतीनिमित्त चिंचवड येथील न्यु इंग्लिश स्कुलचे संस्थापक अध्यक्ष निळकंठ चिंचवडे यांच्या हस्ते आदरांजली वाहण्यात आली.

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे ...

डॉक्टरांनी वेळेवर उपचार दिले नसल्याने महिलेचा मृत्यु झाल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. दोन दिवसांपूर्वी महिलेच्या पोटात दुखत असल्याने सोनोग्राफी करण्यासाठी वायसीएम रूग्णालयात आणले होते. परंतू डॉक्टरांनी तिला रुग्णालयात दाखल करून घेतले. मात्र, सोमवारी (दि.9) रात्री या महिलेची प्रकृती गंभीर झाली. नातेवाईकांनी लगेच डॉक्टरांना बोलवले परंतु डॉक्टर आले नाहीत त्यामुळे या महिलेचा मृत्यू झाला. असा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. तर वायसीएम रूग्णालयात डॉक्टर व कर्मचा-यांची कमी असल्याचे वैद्यकिय अधिकारी मनोज देशमुख यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे गरिब ...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त पक्षाच्या पदाधिका-यांनी झोपडपट्यांमध्ये राहणा-या गोर-गरीब मुलांना 800 शालेय वह्यांचे वाटप केले.

फुलेनगरमधील मैदानासाठी आयुक्तांचे ...

महात्मा फुलेनगरमधील मोकळा भुखंड खेळाडूंची गैरसोय टाळण्यासाठी महापालिकेकडे हस्तांतरीत करण्याची मागणी महापालिका आयुक्त राजीव जाधव यांनी एमआयडीसीकडे पत्रव्यवहार करून केली आहे.

अनियमित वीजपुरवठ्याच्या विरोधात ...

निगडी प्राधिकरणातील नागरिक आणि भाजप कार्यकर्त्यांनी खंडीत वीज पुरवठ्याच्या विरोधात महावितणाच्या कार्यालयात अधिका-यांना घेराव घातला. यासंदर्भात लवकरात लवकर वीजपुरवठा सुरळित करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे अश्वासन अधिका-यांनी दिले आहे. 

‘एलबीटी बचाव’साठी पिंपरी पालिकेत आंदोलन

राज्यातील महापालिकांमधील एलबीटी रद्द करण्याच्या संभाव्य निर्णयाला विरोध दर्शविण्यासाठी काम बंद न करता आंदोलन करण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाने सोमवारी (नऊ जून) घेतला.