Thursday, 12 June 2014

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे ...

डॉक्टरांनी वेळेवर उपचार दिले नसल्याने महिलेचा मृत्यु झाल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. दोन दिवसांपूर्वी महिलेच्या पोटात दुखत असल्याने सोनोग्राफी करण्यासाठी वायसीएम रूग्णालयात आणले होते. परंतू डॉक्टरांनी तिला रुग्णालयात दाखल करून घेतले. मात्र, सोमवारी (दि.9) रात्री या महिलेची प्रकृती गंभीर झाली. नातेवाईकांनी लगेच डॉक्टरांना बोलवले परंतु डॉक्टर आले नाहीत त्यामुळे या महिलेचा मृत्यू झाला. असा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. तर वायसीएम रूग्णालयात डॉक्टर व कर्मचा-यांची कमी असल्याचे वैद्यकिय अधिकारी मनोज देशमुख यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment