Friday, 7 July 2017

हॉटेल चालकांनो, ग्राहकांकडून सक्तीचे सेवाशुल्क आकारू नका

थेट ग्राहक मंचात दाद मागता येणार : अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाची नवीन नियमावली
– बिलातून सेवाशुल्क वजा करण्यास सांगता येणार
– हॉटेल मालकाने वा घातल्यास दाद मागता येणार

आमदार जगताप यांनी माझ्यावर अन्याय केला - राजेंद्र जगताप

राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेले आमदार लक्ष्मण जगताप यांचे चुलत बंधू माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी आज भाजपला राम राम केला. चिंचवडच्या प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात त्यांनी आज पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आमदार जगताप यांनी कायम आपल्यावर अन्याय केल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. 

भाजप नेत्यांचे विकासाकडे दुर्लक्ष - अजित पवार

पिंपरी - ‘‘भाजपची पिंपरी-चिंचवडमध्ये सत्ता आल्यानंतर त्यांचे नेते स्वतःचे महत्त्व, इगो कसा वाढेल, याकडे लक्ष देत आहेत. शहर भकास करण्याच्या दृष्टीने त्यांची पावले पडत आहेत. जिल्हा, राज्य स्तरावरील कोणी नेते बघत नाहीत. कामाचा स्तर घसरत आहे. कारण, त्याला कोणी वालीच राहिला नाही,’’ अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी केली.

विकासाची कामे करूनही जनतेने नाकारले, याचे दु:ख!

पिंपरी पालिका निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर साडेचार महिने शहरात न फिरकणारे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी पक्षमेळाव्याच्या निमित्ताने चिंचवडला हजेरी लावली. पिंपरी-चिंचवड शहरात प्रचंड काम करूनही जनतेने ...

“आधार’ संलग्न बायोमेट्रिक प्रणाली कार्यान्वित करा – मुख्यमंत्री

मुख्यमंत्र्यांचे राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाला आदेश ः 15 ऑगस्टपर्यंत दिली मुदत
मुंबई- राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील सर्व रुग्णालये आणि कार्यालयांमधील “आधार’ संलग्न बायोमेट्रिक उपस्थिती प्रणाली कर्मचाऱ्यांच्या वेतनासोबत जोडण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. कालबद्ध कार्यक्रमाच्या माध्यमातून ही प्रणाली येत्या 15 ऑगस्टपर्यंत कार्यान्वित करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

Thursday, 6 July 2017

सारथीकडे प्रशासनाची पाठ

रावेत : ई-गव्हर्नन्स क्षेत्रात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने मागील काळात नेत्रदीपक कामगिरी केली आहे. २०१३-१४ वर्षांमध्ये पालिकेने मिळवलेले देश-विदेशातील पुरस्कार हे त्याची साक्ष देतात. बेस्ट सिटी, स्मार्ट सिटी या आणि इतर अनेक ...

मराठी शाळांना कर माफी द्या

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील खासगीसह सर्वच मराठी शाळांवरील मिळकत कर माफ करण्यात यावा, अशी मागणी महापौर नितीन काळजे यांनी आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
आयुक्‍तांना दिलेल्या पत्रात म्हटले की, महापालिका हद्दीतील विविध मराठी शाळा कार्यरत आहेत. या शैक्षणिक संस्थांमध्ये शहरातील सर्वसामान्य व गोरगरीब कुटूंबातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या मराठी संस्थांमधून शिक्षण घेत असलेले शहरातील अनेक विद्यार्थी चांगली गुणवत्ता प्राप्त करीत आहेत. त्यामुळे ते विद्यार्थी गुणवत्तेत शहराचे नाव उंचावत आहेत. या संस्थाच्या शैक्षणिक पध्दतीचा शहरातल्या विद्यार्थ्यांना लाभ होत असून, त्यांच्या करिअरमध्ये सुलभतेने प्रवेश करीत आहेत. त्यामुळे मराठी माध्यमांच्या संस्थांना त्या शैक्षणिक कार्य करित असल्याने त्यांचा कर माफ करावा व याबाबतचा प्रस्ताव सक्षम समितीपुढे सादर करण्याच्या सुचनाही काळजे यांनी केल्या आहेत