Saturday, 29 July 2017

प्रभाग अध्यक्षांच्या निवडीला क्रांती दिनाचा “मुहुर्त’

पिंपरी – महापालिकेच्या प्रभाग समिती अध्यक्ष पदांच्या निवडी 9 ऑगस्टला क्रांती दिनी जाहीर केल्या जाणार आहेत. तसेच, नवीन विस्तार केलेल्या “ह’ आणि “ग’ या प्रभाग कार्यालयाचे उद्‌घाटनही करण्यात येणार आहे, अशी माहिती सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी दिली.

वाहतूक नियमनासाठी व्हॉट्‌सॲपचा वापर

पिंपरी - सोशल मीडियात प्रभावी असलेल्या व्हॉट्‌सॲपचा दुरुपयोग होतो, याबाबत कायमच ऊहापोह होतो. मात्र, सांगवी वाहतूक विभागाचे निरीक्षक किशोर म्हसवडे यांनी वाहतूक नियमन व वाहतूक समस्या सोडवण्यासाठी व्हॉट्‌सॲपचा प्रभावी वापर सुरू केला आहे. त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

हिंजवडीत समस्यांची डोकेदुखी

पिंपरी : हिंजवडी परिसरातील आयटी कंपन्यांमध्ये काम करणारे अभियंते, तसेच अन्य कर्मचारी यांना मोठ्या रकमेचा पगार मिळत असल्याने त्यांचे रहाणीमानसुद्धा उंचावलेले असते. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अथवा खासगी बस सुविधा सक्षम नाही. त्यामुळे ते स्वत:ची चारचाकी ... हिंजवडी ...

‘हिंजवडीच्या समस्या गांभीर्याने घेणार कधी?’

पिंपरी - हिंजवडी आयटी पार्कमधील जटिल वाहतूक समस्या सोडविण्याच्या दृष्टीने ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या ‘दुष्टचक्रात हिंजवडी’ या वृत्तमालिकेला वाचकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. अनेकांनी संपर्क साधत ‘सकाळ’चे विशेष आभार मानले. तसेच समाधान व्यक्त केले. दररोजच्या वाहतूक कोंडीने ग्रासलेल्या अनेक आयटीयन्सनी त्यावरील काही उपाययोजनादेखील सुचविल्या. तर महाराष्ट्राची विशेषतः पुण्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण करणाऱ्या हिंजवडीच्या समस्यांकडे शासन गांभीर्याने कधी पाहणार, असा प्रश्‍नही उपस्थित केला.

पिंपरी-चिंचवडमध्ये चोरांचा धुमाकूळ, पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्न चिन्ह

पिंपरी-चिंचवड शहरात सध्या चोरांनी धुमाकूळ घातला आहे. पिंपरी गावठाण येथील महालक्ष्मी मंदिरातील तब्बल १५ ते २० तोळे सोन्यावर डल्ला मारला आहे. सामान्य जनता त्रासलेली असताना मदिरात झालेल्या चोरीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर ...

हिंजवडी, वाकड बनलाय असुरक्षित

पिंपरी : हिंजवडी व वाकड आयटी पार्क परिसरात केवळ आयटीयन्सच बरोबर ज्येष्ठ नागरिक, महिला व प्रवासीही असुरक्षित असल्याच्या घटना वारंवार घडू लागल्या आहेत. लिफ्ट देण्याचा बहाणा करून प्रवाशांची लुबाडणूक करण्याच्या घटनांमध्ये ...

Friday, 28 July 2017

'मेट्रो'साठी पर्यावरण पणाला नको

पिंपरी : मेट्रो प्रकल्पाचा पहिला मार्ग पिंपरी-चिंचवड शहरातून जाताना ४८६ झाडे बाधित होणार आहेत. त्यामुळे ग्रीन सिटी म्हणून ओळख असणाºया उद्योगनगरीच्या पर्यावरणाला धोका निर्माण होणार आहे. आमचा मेट्रो प्रकल्पाला विरोध नाही.