पीएमपी सेवा सुधारली; काही प्रश्न कायमपुणे - अपेक्षित थांब्यावर बस थांबवली नाही म्हणून जाब विचारणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला चालकाने मारहाण केली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर थांब्यावर अपेक्षित ठिकाणी बस थांबतात का, यासह पीएमपी सेवेबाबत ‘सकाळ’ने गुरुवारी पाहणी केली. यात अनेक ठिकाणी बस थांब्यापासून लांबच उभ्या राहत असल्याचे दिसले. गाड्यांच्या फेऱ्या वाढल्यामुळे प्रवाशांची सोय झाली आहे, मात्र वेळापत्रक न पाळणे, महिलांच्या राखीव जागांवर बसणारे पुरुष प्रवासी यासारखे प्रश्न असल्याचे आढळले.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Friday, 4 August 2017
सांगवीतील विसर्जन घाटाची दूरवस्था
सांगवी – जुनी सांगवी येथील पवना नदीवरील गणपती विसर्जन घाटाच्या पायऱ्या तुटल्या असून, गणपती स्थापनेच्या अगोदर त्या दुरुस्ती करण्यात याव्यात, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये धुमाकूळ घालणारी चोरट्यांची टोळी पोलिसांच्या जाळ्यात
पिंपरी-चिंचवड परिसरात घरफोडी आणि दुचाकी चोरी करणाऱ्या दोन टोळ्यांच्या मुसक्या आवळण्यात चिंचवडपोलिसांना यश आले. पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून त्यांच्याकडून तब्बल ७ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी ...

शालेय क्रीडा स्पर्धांचे नवीन वेळापत्रक जाहीर
जिल्हा क्रीडा परिषद आणि पिंपरी-चिंचवड महापालिका आयोजित जिल्हास्तर शालेय आणि महिला क्रीडा स्पर्धांचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
एच. ए. कामगारांचे पुन्हा वेतन थकले
चार महिन्यांपासून प्रतिक्षा : कामगारांमध्ये संतापाचे वातावरण
पिंपरी – केंद्र सरकारचा सार्वजनिक उपक्रम असलेल्या पिंपरीतील हिंदुस्तान ऍन्टीबायोटिक्स (एच. ए.) मधील कामगारांचे वेतन थकण्याचा प्रकार पुन्हा सुरु झाला आहे. या कामगारांचे एप्रिल महिन्यापासून आजपर्यंत एकूण चार महिन्यांचे वेतन थकले आहे. आता आणखी किती महिन्यानंतर वेतन मिळणार, याकडे कामगारांचे लक्ष लागले आहे.
चापेकर बंधूंच्या क्रांतीतीर्थ स्मारकाचा होणार कायापालट
संग्रहालय, ग्रंथालय, म्युरल्सद्वारे उलगडणार ऐतिहासिक कालखंड
पिंपरी: चिंचवडगाव येथील क्रांतिवीर चापेकर बंधू यांच्या क्रांतीतीर्थ स्मारकाचा (चापेकर वाडा) कायापालट होणार आहे. स्मारकाशेजारील सात गुंठे मोकळ्या जागेत संग्रहालय, ग्रंथालय आणि म्युरल्सद्वारे ऐतिहासिक कालखंड उलगडणार आहे. संबंधित कामाचे भूमीपूजन सप्टेंबरमध्ये करण्याचे नियोजन आहे.

Thursday, 3 August 2017
आता 'सीएम'च पिंपरीचे 'दादा'
पिंपरीः राज्य विधिमंडळाचे अधिवेशन चालू असतानाही वेळात वेळ काढून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रविवारी (ता.13) पिंपरी-चिंचवडच्या खास दौऱ्यावर येत आहेत. त्यातून त्यांचे राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूरनंतर राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला व बारामतीनंतर आवडीच्या असलेल्या पिंपरी-चिंचवडवर विशेष लक्ष असल्याचे दिसून येत आहे.


Subscribe to:
Posts (Atom)