Friday, 8 September 2017

निमंत्रण द्या ‘डिजिटल’द्वारे

युवा उद्योजक चिन्मय कवी यांचा पालिका आयुक्तांना प्रस्ताव
पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिका निरनिराळ्या कार्यक्रमांच्या निमंत्रण पत्रिका छापण्यासाठी तब्बल १७ लाख ३५ हजार रुपये खर्च करते. एकीकडे नरेंद्र मोदींच्या केंद्र सरकारने डिजिटल इंडियाचा नारा दिला जातो. तर त्यांची सत्ता असताना पिंपरी-चिंचवड महापालिका अद्याप जुन्याच निमंत्रण पत्रिका छपाईची पद्धत वापरते. त्यामुळे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना ई-व्हॉट्‌सअप आणि मोबाइलच्या माध्यमातून आमंत्रण देण्याची प्रथा सुरू करून केंद्राचे डिजिटलचे स्वप्न खऱ्या अर्थाने साकार करण्याचा प्रस्ताव युवा उद्योजक चिन्मय कवी याने महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांना दिला आहे. 

अमर साबळे यांच्याविषयी संताप

आंबेडकरवादी संघटनांकडून आंदोलनाद्वारे निषेध; गुन्हा दाखल करण्याची मागणी
पिंपरी - राज्यसभा खासदार अमर साबळे यांनी आंबेडकरवादी संघटनांबाबत वादग्रस्त विधान केल्याबद्दल गुरुवारी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर भारिप बहुजन महासंघ, रिपब्लिकन सेना, एमआयएम व सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने साबळे यांचा निषेध करण्यात आला. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचीही मागणी करण्यात आली. 

भाजप नेत्याची कर्जमाफीसाठी ‘फिल्डिंग’

पिंपरी-चिंचवडमधील प्रकार; राजकीय दबावामुळे बँकही हतबल
पिंपरी - राज्यातील भाजप सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेल्या कर्जमाफीची योजना जाहीर केली. गरीब पीडित लोकांना कर्जमाफी देण्यात काही वावगे असायचे कारण नाही, पण एखाद्या श्रीमंत व्यक्तीने चैनीसाठी अधाशासारखे कर्ज घ्यायचे आणि ते फेडायचे सोडून कर्जमाफीसाठी दबाव आणायचा, याला तुम्ही काय म्हणाल? राग आला ना, होय हे संतापजनकच आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये असाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पिंपरी-चिंचवडमधील पवना, मुळा आणि इंद्रायणी नदीसुधारला मिळणार का गती?

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात नितीन गडकरी यांना नदी सुधार आणि गंगा नदीसुधार हेही खात्याची जबाबदारी सोपविली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड आणि पुण्याच्या जवळच्या पवना, मुळा आणि इंद्रायणीनदीस गती मिळेल, अशी आशा महापालिकेतील ...

आधारकार्डच्या दुरुस्तीसाठी 25 ऐवजी 50 रुपये; दुरुस्ती नव्हे दुकानदारी

नवीन आधार कार्ड काढण्यासाठी व दुरुस्तीसाठी ७ ते १० नोव्हेंबर २०१७ या कालावधीत विशेष अभियान आयोजित करण्यात आले आहे. मात्र महापलिकेच्या क क्षेत्रीय कार्यालयात नागरिकांकडून आधारकार्डच्या दुरुस्तीसाठी 25 ऐवजी 50 रुपये घेतले जातात. त्यामुळे या अभियानाचा फज्जा उडाल्याचे दिसत आहे. नागरिकांकडून जास्त पैसे आकारुन दुकांनदारिच सुरु असल्याचे चित्र दिसत आहे.

“रिंग रोड’प्रश्‍नी मुख्यमंत्र्यांना वेळ मिळेना!

पिंपरी – महापालिका सर्वसाधारण सभेत प्रस्तावित “रिंग रोड’ प्रश्‍नावर सर्वपक्षीय शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटायला जाणार होते. परंतु, मुख्यमंत्र्यांनी अद्याप वेळ दिला नाही, त्यांनी वेळ दिल्यावर “रिंग रोड’प्रश्‍नी सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेवून जावू, अशी माहिती सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

विकास कामांसाठी 48 लाखांच्या खर्चाला मंजुरी

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील विविध विकास विषयक कामे करण्यासाठी येणाऱ्या 48 लाख 35 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.