Saturday, 9 September 2017

देशात बावीस लाख “ई-बाईक’ धावणार – नितीन गडकरी

पिंपरी – उत्तम चालक निर्मितीसाठी येत्या आठवड्यामध्ये देशभरात दोन हजार “ड्रायव्हींग ट्रेनिंग इन्स्टिट्यूट’ सुरू करण्यात येणार आहेत. सुमारे बावीस लाख “इलेक्‍ट्रिक बाईक’ आणण्यात येणार आहे. त्या दुचाकींना ऑटो रिक्षा, टॅक्‍सीप्रमाणे प्रवासी वाहतुकीचे परवाने दिले जातील, अशी माहिती केंद्रीय परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज (शुक्रवारी) भोसरी येथे दिली.

‘सुपर स्पेशालिटी’चे ‘तीनतेरा’

अत्याधुनिक यंत्रणेच्या अभावामुळे डॉक्‍टर मेटाकुटीला
पिंपरी - वायसीएम रुग्णालयातील मेडिसीन विभागाप्रमाणे शस्त्रक्रिया विभागही तेवढाच महत्त्वाचा आहे. मात्र, प्रशानासाच्या दुर्लक्षामुळे सुपर स्पेशालिटी असलेल्या या रुग्णालयाच्या कामकाजाचे तीनतेरा वाजले आहेत. डॉक्‍टरांची कमतरता, अत्याधुनिक यंत्रणेचा अभाव यामुळे येथील डॉक्‍टर मेटाकुटीला आले आहेत. एकीकडे शस्त्रक्रियेसाठी सर्वसामान्य रुग्णांना कित्येक आठवडे ताटकळत राहावे लागते. दुसरीकडे वशिल्याच्या रुग्णांवर तातडीने शस्त्रक्रिया केली जाते. 

स्वस्त धान्य दुकानांत रॉकेल सर्वांना मिळणार

पुणे - स्वयंपाक आणि दिवाबत्ती व्यतिरिक्त औद्योगिक, कृषिक्षेत्रासह अन्य व्यावसायिकांकडून रॉकेलला मागणी वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर फ्रिसेल (व्हॉइट) रॉकेल उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.त्यामुळे आता राज्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानांत अनुदानित रॉकेलसह फ्रि सेल रॉकेल विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. तसेच सरकारी कंपन्यांचे एलपीजी गॅसचे पाच किलोचे सिलिंडरही या दुकानांत मिळणार आहेत. या योजनेस सरकारने नुकतीच मान्यता दिल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या उपायुक्त नीलिमा धायगुडे यांनी दिली. 

पथ विक्रेता कायद्याची अंमलबजावणी करा अन्यथा तीव्र आंदोलन – काशिनाथ नखाते

महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे आज महासंघाचे चिंचवड येथील कार्यालयात फेरीवाला घटकांच्या विविध समस्या सर्वेक्षण आदी विषयांवर बैठक घेण्यात आली. महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, उपाध्यक्ष साईनाथ खंडीझोड, कार्याध्यक्ष राजू बिराजदार, मधुकर वाघ, राजू बोराडे, ओमप्रकाश मोरया, महिला उपाध्यक्ष अरुणा सुतार, शोभा दुधे, योगिता पाटील, विमल काळभोर, सुनीता पाटील, नंदा मुळे,रंजना साळवी मंगल सूर्यवंशी, सुरेश देडें, शैलेश प्रसाद,बबन लोंढे,महेंद्र पवार,बालाजी धमाणगावे, अनिल कोहिणकर, वासुदेव मनूरकर, महेंद्र भुजबळ,मल्हारी सोनवणे, काळुराम पारधी, शंकर लांदे, यांच्यासह शहरातील विविध ठिकाणचे विक्रेते या वेळी उपस्थित होते.

निगडीत चोरटे जेरबंद ,घरफोडी करणा-या सराईत चोरट्यांना निगडी पोलिसांनी सापळा रचून केले जेरबंद

पिंपरी : शहरात विविध ठिकाणी घरफोडी करणा-या तीन सराईत चोरट्यांना निगडी पोलिसांनी सापळा रचून जेरबंद केले आहे. ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर ... घोडके आणि अयाझ अस्लम शेख (रा. लिंकरोड भटनगर पत्राशेड, चिंचवड) अशी आरोपींची नावे आहेत.

शिवसेनेतच राहणार - आढळराव

पिंपरी - ‘‘मी शिवसेनेतच राहणार असून, आगामी निवडणुकीतही चांगले मताधिक्‍य मिळवून मीच निवडून येणार आहे,’’ असे शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी ‘सकाळ’शी बोलताना स्पष्ट केले. आढळराव पाटील भारतीय जनता पक्षात प्रवेश करून लोकसभेची निवडणूक लढविणार असलेल्या चर्चेचे खंडन करताना ते बोलत होते. शहर दौऱ्यावर आले असताना आढळराव-पाटील ‘सकाळ’च्या प्रतिनिधीशी बोलत होते.

डॉ. साळवे यांच्या पदोन्नतीला हिरवा कंदील

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारीपदी डॉ. अनिल रॉय यांच्याऐवजी डॉ. पवन साळवे यांना पदोन्नती देण्याच्या प्रस्तावाला विधी समितीने मान्यता दिली आहे.महापालिकेच्या महासभेसमोर हा प्रस्ताव मांडला जाणार असून याबाबत सत्ताधारी भाजप कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.