पुणे - स्वयंपाक आणि दिवाबत्ती व्यतिरिक्त औद्योगिक, कृषिक्षेत्रासह अन्य व्यावसायिकांकडून रॉकेलला मागणी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर फ्रिसेल (व्हॉइट) रॉकेल उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.त्यामुळे आता राज्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानांत अनुदानित रॉकेलसह फ्रि सेल रॉकेल विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. तसेच सरकारी कंपन्यांचे एलपीजी गॅसचे पाच किलोचे सिलिंडरही या दुकानांत मिळणार आहेत. या योजनेस सरकारने नुकतीच मान्यता दिल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या उपायुक्त नीलिमा धायगुडे यांनी दिली.
No comments:
Post a Comment