Monday, 11 September 2017

वायसीएम रुग्णालयाची सुरक्षा वाऱ्यावर

पिंपरी - रुग्णालयात घुसून टोळक्‍याची हाणामारी, डॉक्‍टरांवर होणारे हल्ले आणि मूल चोरी या प्रकरणांमुळे वायसीएमच्या सुरक्षेबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. रुग्णालयाच्या दुसऱ्या, तिसऱ्या, सहाव्या आणि सातव्या मजल्यावर अद्यापही सीसीटीव्ही कॅमरे लावलेले नाहीत. यामुळे वायसीएम रुग्णालय प्रशासन सुरक्षेबाबत अजिबात गंभीर नसल्याचे दिसून आले.

पितृपंधरवड्यामुळे मोशीत भाजीपाल्याची आवक वाढली

पिंपरी – गणेशोत्सवानंतर सुरु झालेल्या पितृ पंधरावड्यामुळे मोशीतील नागेश्‍वर महाराज उपबाजारातील पालेभाज्यांची आवक तिपटीने वाढली असून, भाव देखील वधारले आहेत.

पालिकेच्या कंत्राटी कामगारांची उपेक्षा

पिंपरी – महापालिकेतील कंत्राटी कामगारांची नियत वेतन श्रेणीनुसार मासिक वेतन मिळत नसून त्यांची उपेक्षा होत असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते विक्रम पवार यांनी केली आहे.

सफाई कर्मचाऱ्यांच्या मुलांना शिक्षणासाठी अर्थसहाय्य

– अॅड. सागर चरण युवा मंचचा उपक्रम
पिंपरी – पिंपरीतील अॅड. सागर चरण युवा मंचच्या वतीने शैक्षणिक अर्थसहाय्य उपक्रमांतर्गत महापालिका सफाई कर्मचाऱ्यांच्या दोन मुलांना प्रत्येकी 50 हजार रुपयांना धनादेश देण्यात आला. ही दोन्ही मुले अभियांत्रिकी पदवीचे शिक्षण घेत आहेत.

कोंडीच कोंडी चहूकडे

पुणे आणि पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत वाहन नोंदणीने नुकताच ५० लाखांचा आकडा ओलांडला. त्यामध्ये दुचाकींची संख्या ७५ टक्के आहे. पुणे जिल्ह्यात एक प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड, बारामतीची दोन ...

पिंपरी चिंचवड मनपाचा कचरा गोळा करण्यासाठी कोट्यवधींचा खर्च, प्रभागनिहाय नियोजन

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराच्या आठ प्रभाग क्षेत्रांतील कचरा गोळा करणे, त्याची मोशी कचरा डेपोपर्यंत वाहतूक करणे या कामावर महापालिकेच्या वतीने कोट्यवधी रुपये खर्च करणार आहेत. आठ वर्षांच्या कालावधीसाठी हे काम दिले जाणार आहे. विशेष ...

आयुक्‍तांच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता

परस्पर प्रभाग कार्यक्षेत्राचे वाटप : बांधकाम सहशहर अभियंत्याचे आदेश
पिंपरी – महापालिका बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाच्या सहशहर अभियंत्याने आयुक्‍तांच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. त्यांनी आयुक्‍तांची मान्यता न घेता कार्यकारी अभियंत्यांना परस्पर प्रभाग कार्यालयाच्या कार्यक्षेत्र कामकाजाचे वाटप केले आहेत. याविषयीचे पत्रक “व्हॉट्‌सऍप’वर “व्हायरल’ झाले आहे.