Wednesday, 13 September 2017

महिलांसाठी अत्याधुनिक स्वच्छतागृहांची व्यवस्था; “बीआरटी’चा पुढाकार

पिंपरी, (प्रतिनिधी) – स्मार्ट सिटीत भर पाडणाऱ्या सार्वजनिक स्वच्छतागृहांची सुविधा सक्षम करण्यासाठी महापालिकेच्या वतीने शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी महिला आणि पुरुषांसाठी अत्याधुनिक सार्वजनिक स्वच्छतागृहांची व्यवस्था केली जात आहे. महापालिकेच्या बस रॅपीड ट्रान्झीट सिस्टीम (बीआरटी) प्रशासन हे काम हाती घेतल्याची माहिती स्वच्छ भारत अभियानचे सहआयुक्त दिलीप गावडे यांनी सांगितली.

पिंपरी-चिंचडवमध्ये विद्यार्थिनींची छेड काढणाऱ्या तरुणाला दामिनी पथकाने चोपले

पिंपरी-चिंचवड येथे मंगळवारी विद्यार्थिनींची छेड काढणाऱ्या एका तरुणाला महिला पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली. आज दुपारी तळेगावच्या इंद्रायणी महाविद्यालयासमोर दुचाकीवर बसलेला एक तरुण विद्यार्थिनींकडे पाहून अश्लील हावभाव करत ...

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण नकाशाची पुनर्ररचना होणार – आमदार जगताप

चौफेर न्यूज –  पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाशी संबंधित प्रलंबित प्रश्नांवर भाजप शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप यांनी विभागीय आयुक्त व प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत सोमवारी (दि. 11) पुण्यात बैठक घेतली. बैठकीत विभागीय आयुक्त दळवी यांनी नकाशाच्या पुनर्ररचनेचा अंतिम प्रस्ताव महिन्याभरात सादर करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. प्राधिकरणाच्या नकाशाची पुनर्रचना झाल्यास अनधिकृत बांधकामांमध्ये राहणाऱ्या सुमारे एक लाख नागरिकांना फायदा होणार असल्याचा दावा आमदार जगताप यांनी केला आहे.

उद्योगनगरीला नवरात्रोत्सवाचे वेध

तरूणाईचा दांडिया व गरबाचा सराव सुरू : बाजारपेठ सज्ज
पिंपरी – गौरी-गणपती सणानंतर आता भाविकांना नवरात्रोत्सवाचे वेध लागले आहेत. खास तरूणाईसाठी आकर्षक असलेल्या या नवरात्रोत्सवात तरूणाईला भुरळ पाडणाऱ्या गरबा व दांडियाचा सराव सुरू झाला आहे. देवीच्या मूर्तींवर मूर्तीकार अखेरचा हात फिरवत असून बाजारपेठही नवरात्रोत्सवासाठी सज्ज झाली आहे.

पिंपरी- चिंचवड शहरातील क्रांतीविरांच्या पुतळ्यांचे शुभोभिकरण करा

चौफेर न्यूज –  चिंचवड स्टेशन येथील क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे आणि क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या पुतळा उभारणीला 33 वर्षे लोटली आहेत. मात्र, महापालिकेकडून पुतळ्याची स्वच्छता व सुशोभिकरण याकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे. भारतीय लहुजी सेनेने याकडे लक्ष वेधत पुतळा परिसरत सुशोभिकरणाची मागणी केली आहे.

पिंपरी चिंचवड: चालकाविना धावली बस, गॅरेजमध्ये घुसली



पुण्यात बसचे ब्रेक निकामी होऊन अपघात झाल्याची घटना ताजी असताना आज संध्याकाळी पिंपरी चिंचवड मधील पिंपळे गुरव बस स्थानकात आश्चर्यचकित करणारी घटना घडली. चालक-वाहकाविना उभी असलेली बस अचानक सुरू होऊन ९० मीटर अंतरावरील गॅरेजमध्ये ...

Tuesday, 12 September 2017

'पीएमपी'वर भरोसा नाय का?

पुणेः पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात सार्वजनिक वाहतुकीची जबाबदारी अजूनही पीएमपीच्या खांद्यावर आहे. पीएमपीची स्थापना होऊन दहा वर्षे झाली, तरी अद्याप मूळ हेतू साध्य झालेला नाही. पीएमपीची अवस्था बदलण्याचे प्रयत्न अजूनही सुरूच असून, ...