गणेशनगरमधील या खोदकामात भूमिगत वीजवाहिनी तोडल्याने दापोडी व गणेशनगरमधील सुमारे १२०० ग्राहकांचा वीजपुरवठा दोन तास खंडित होता. तसेच महावितरणचेही सुमारे ६० हजार रुपयांचे नुकसान झाले. याप्रकरणी महावितरणकडून भोसरी पोलीस ठाण्यात ...
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Sunday, 22 October 2017
दिवाळी फराळाच्या निमित्ताने पिंपरीतले राजकीय फटाके एकत्र…! दिशा सोशल फाउंडेशनने जुळवला योग…!
पिंपरी (प्रतिनिधी):- एरवी पिंपरी चिंचवड मधले सर्व स्थानिक नेते एकमेकांवर आरोप करण्यात दंग असतात. पण आज हे सर्व स्थानिक नेते एकत्र आले, निमित्त होतं दिशा सोशल फाउंडेशन आयोजित दिवाळी फराळाचे. या दिवाळी फराळाच्या निमित्ताने शहरातले हे राजकीय फटाके एकत्र आले होते. पण यावेळी वेळेचे आणि प्रसंगाचे भान राखत या फटाक्यांनी एकमेकांवर वाजण्याचे काम केले नाही. पण कोपरखळ्यांनी ही मैफिल दिवाळीच्या फराळासारखी चांगलीच खुसखुशीत झाली.
रांगोळी प्रदर्शनातून उलगडले सर्पांचे विश्व
पिंपरी – एरव्ही भितीने गाळण उडवणारे किंग कोब्रा, घोणस, मण्यार, फुरसे हे साप चक्क लोभस भासत होते… हे उद्गार काहीसे काल्पनिक वाटतील, परंतु, हे संवाद प्रत्यक्षात चिंचवडच्या संभाजीनगर येथील निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयात ऐकायला मिळाले. निमित्त होते सर्प रंगावलीचे.
रेड्या, म्हशींच्या मिरवणुकीने चिंचवडमध्ये सगर उत्सव साजरा
पिंपरी – दिवाळी पाडव्याच्या दिवशी साजरा होणारा सगर उत्सव शनिवारी (दि.21) मोहननगर, चिंचवडमध्ये उत्साहात पार पडला. सगरची प्रथा परंपरा जपत मोहननगर परिसरात रेडे व म्हशींची मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली होती. सवाद्य मिरवणुकीमुळे हा परिसर दुमदुमुन गेला होता. गवळी समाजातील शेकडो कार्यकर्ते मिरवणुकीत सहभागी झाले होते.
साथीच्या आजारामुळे रुग्ण संख्येत वाढ
पिंपरी – वातावरणातील बदलाने पिंपरी-चिंचवड शहरात साथीचे आजार वाढले आहेत. शहरातील छोट्या-मोठ्या दवाखान्यांसह महापालिका रुग्णालये रुग्णांनी हाऊसफुल्ल झाल्याचे चित्र दिसत आहे. याप्रसंगी रुग्णांना रक्त, लघवीसह अन्य विविध प्रकारच्या टेस्ट करण्यास भाग पाडल्याने नागरिकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागत आहे.
बेकायदेशीर वृक्षतोड अधिकाऱ्यांच्या अंगलट
पिंपरी – इंद्रायणीनगर येथील फायकस प्रजातीचे दुर्मिळ झाड तोडल्यानंतर अडचणीत सापडलेले उद्यान विभागातील अधिकारी वृक्ष छाटणीची परवानगी घेतल्याचे भासवत आहेत. प्रत्यक्षात परवानगी घेतली नसताना स्वतःला वाचविण्यासाठी झाड तोडल्यानंतर दोन दिवस अगोदरच्या तारखेचे परवानगी पत्र तयार करून त्यावर स्वाक्षरी घेतल्या आहेत. त्यामुळे आता स्वाक्षरी करणारे अधिकारीही अडचणीत सापडले आहेत.
Friday, 20 October 2017
Four-lane 'butterfly' bridge to link Chinchwadgaon to Wakad
Currently, the residents of Chinchwadgaon, Pimpri link road and surrounding areas have to use the narrow two-lane bridge near Moraya Gosavi temple bund to reach the Chinchwadstation-Dange chowk road. But this bridge is very narrow and barely one ...
Subscribe to:
Posts (Atom)