Saturday, 18 November 2017

आणि कलाटे पवारांमध्ये जुंपली….!

वाकड मधील एका कामाच्या मंजुरीच्या निमित्ताने आज पिंपरी महापालिकेत सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार आणि शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांच्यात चांगलीच जुंपली. काही पदाधिकाऱ्यांनी ऐनवेळी मध्यस्थी केल्याने हे प्रकरण ‘हात घाई’ वर जाता जाता राहिले.

शहरातील नाट्यगृहे रंगकर्मींना देण्यास प्राध्यान्य द्यावे – अमित गोरखे

पिंपरी चिंचवड शहरातील कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे, नागरिकांना सांस्कृतीक कार्यक्रमांचा आस्वाद घेता यावा. यासाठी महापालिकेने शहरात चार नाट्यगृहांची निर्मिती केली आहे. मात्र, त्याचा वापर सांस्कृतीक कार्यक्रमापेंक्षा इतर खासगी कार्यक्रमांसाठी जास्त प्रमाणात केला जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महापालिकेने महिन्यातील चार रविवार सांस्कृतीक कार्यक्रमांसाठी नाट्यगृहे आरक्षित ठेवावीत, अशी मागणी संस्कार भारती आणि कलारंग संस्थेचे अध्यक्ष अमित गोरखे यांनी महापालिकेकडे केली आहे.

दुरूस्तीची काढलेली कामे म्हणजे कामांचा दिखावा?

जुनी सांगवी - पिंपरी चिंचवड शहरात सत्तातरानंतर पहिल्यांदाच पालिकेने प्रत्येक कामात सल्लागार नियुक्त करून सर्व सामान्य माणसांच्या कररूपी पैशांची उधळपट्टी सुरू असुन ती थांबविण्यात यावी, याबाबत महापालिका आयुक्तांकडे माजी स्थायी अध़्यक्ष प्रशांत शितोळे यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.निवेदनात म्हटले आहे की,पिंपरी चिंचवड शहराचा सन २००२ ते २०१७ पर्यंतच्या काळातील विकास पाहता पिंपरी चिंचवड महापालिका ही देशातील वेगाने विकसित झालेली महापालिका आहे. २०१७ च्या सत्तांतरानंतर गेल्या काही महिन्यांपासुन सत्ताधारी व प्रशासन कोणत्याही कामासाठी सल्लागार नेमुन सर्वसामान्य माणसांच्या कररूपी पैशांची उधळपट्टी करत आहे? विशेष म्हणजे सन २०१७ पुर्वी सल्लागारांना तिव्र विरोध करणारे आत्ता सत्ताधारी झाल्यावर सल्लागारांना स्वागत कक्ष उभारून बसले आहेत. अनेक,रस्त्यांच्या कामाला दुरूस्तीची गरज नसताना सल्लागारांमार्फत कामे काढुन कामांचा दिखावा कशासाठी?अनेक कामांचा क्रॉस सेक्शन काँमन असताना असतानाही सल्लागारांची नेमणुक कशासाठी, यात महापालिकेचे अधिकारी निष्क्रिय झाले आहेत का? कामावर तुमचे नियंत्रण नाही का? असे अनेक प्रश्न त्यांनी या  निवेदनात विचारले आहेत.यात विविध चुकींच्या कामाचे दाखले त्यांनी निवेदनात दिले आहेत.

Proposal for Aadhaar-linked e-registration still awaits nod

It has been over a year since proposed, but the state government is yet to give its nod to amend Registration Rules, 1961, for enabling individuals to go for Aadhaar-linked e-registration of properties.

‘मूडीज्’ने भारताचे क्रेडिट रेटिंग वाढवले; रेटिंगमध्ये तब्बल 13 वर्षांनंतर सुधारणा

नवी दिल्ली – भारतीय अर्थव्यवस्थेसंदर्भातील एक चांगली बातमी समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय रेटिंग एजन्सी ‘मूडीज्’ने भारताच्या लोकल आणि फॉरेन करन्सी एश्युअर रेटिंगमध्ये बीएए3 वरुन बीएए2 असा बदल केला आहे. भारत सरकारने लागू केलेल्या जीएसटी, आधार संलग्नता आणि विविध लाभांचे पैसे थेट खात्यात जमा करणे अशी विविध महत्त्वाची पावले उचलण्यात आल्याने  ‘मूडीज्’ने हा निर्णय घेतला आहे.

Friday, 17 November 2017

प्रवाशांसाठी बीआरटी पार्कींगची व्यवस्था

पिंपरी – शहरातील बीआरटीएस मार्गांवर प्रवाशांच्या सोयीसाठी राबविलेल्या बीआरटी पार्कींग संकल्पनेतून टीडीआर व एफएसआयचा गोरखधंदा झाला. मात्र, त्याचा हिशोब पालिकेकडे नसल्यामुळे हे पार्कींग नागरिकांसाठी असून नसल्यासारखे आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर खासगी जागेतील हे बीआरटी पार्कींगचा शोध घेऊन ते प्रवाशांना उपलब्ध करून देणार असल्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले आहे.

PCMC to set up panel for development

Pimpri Chinchwad: The standing committee of Pimpri Chinchwad Municipal Corporation has approved a short notice proposal to appoint a principal consultant to drive development in the city.