Monday, 4 December 2017

भूमिगत जलवाहिनीसाठी 57 लाखांचा खर्च

पिंपरी – महापालिकेच्या फ प्रभागांतर्गत म्हेत्रेवस्ती, त्रिवेणीनगर, सहयोगनगर भागात नवीन पाणी पुरवठा पाईपलाईन भूमिगत करण्यात येणार आहे. त्यासाठी पाणी पुरवठा विभागाने दोन वेगवेगळ्या निविदा प्रसिध्द केल्या आहेत. निविदेतील अटी-शर्तीनुसार योग्य दराप्रमाणे 56 लाख 78 हजार रुपये खर्चून जलवाहिनी भूमिगत करण्यात येणार आहे.

दिव्यांगांसाठी दहा कोटीची तरतूद करणार

पिंपरी – महापालिकेच्या वतीने शहरात अपंग सुविधा केंद्र उभारण्यात येणार आहे. त्या माध्यमातून अंध, अपंग, मतीमंद अशा विशेष व्यक्तींना सेवा-सुविधा उपलब्ध करण्यासाठी दहा कोटींची तरतूद करण्यात येईल. तसेच अपंगांना दोन हजार “पेन्शन’ देणारी पिंपरी-चिंचवड ही देशातील पहिली महापालिका आहे, असा दावा सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी केला आहे.

“सरल’च्या कामकाजात विघ्न!

पिंपरी – महापालिका शिक्षण प्रशासन विभागातील “सरल’ प्रणालीचे कामकाज गेल्या तीन वर्षापासून अद्याप पर्यंत 60 टक्केच पूर्ण झालेले आहे. ज्या प्रणालीतून बोगस शाळांना चाप बसून योग्य ती विद्यार्थी व शिक्षक संख्या समोर येणे महत्त्वाचे असताना “सरल’चे कामकाज अनधिकृत शाळा व विद्यार्थ्यांच्या पायाभूत चाचणीत मिळालेल्या गुणांमुळे रखडून पडले आहे.

रेशनिंगवर मिळणार 55 रुपये किलो दराने तुरडाळ

पिंपरी – रेशनिंगवर तुरडाळ उपलब्ध करुन देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याकरिता 55 रुपये प्रतिकिलो दराने ही डाळ उपलब्ध करुन दिली जाणार आहे. राज्यभरातील सार्वजनिक वितरण प्रणाली असलेल्या सर्व रेशनिंग विक्री दुकानांमधून ही डाळ वितरीत केली जाणार आहे. राज्यातील सर्व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत. या कार्यवाहीत कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.

पालकमंत्र्यांच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता

पिंपरी – महापालिकेत सत्तांतर होवून भाजपने सत्ता हस्तगत केल्यानंतर पिंपरी-चिंचवड शहराचे कारभारी म्हणून पालकमंत्री गिरीश बापट यांनी कामकाजात लक्ष घातले आहे. बापट यांनी पवना नदीवरील पुर्वीचा बंधारा जीर्ण झाल्याने नवीन बंधाऱ्याचे काम तातडीने हाती घेण्याच्या सुचना पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना दिल्या. परंतु, पाटबंधारे व पाणीपुरवठा अधिकाऱ्यांत समन्वय न राहिल्याने पवनेचा बंधारा अद्याप कागदावर राहिला असून पालकमंत्र्याच्या आदेशाला पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत.

ईद-ए-मिलाद उत्साहात साजरी

पिंपरी – मुस्लिम धर्माचे शेवटचे संदेशवाहक आणि ज्यांच्याद्वारे पवित्र कुराण भूतलावर अवतरित झाले असे हजरत मुहम्मद पैगंबर (स.) यांची जयंती अर्थात ईद-ए-मिलादचा सण शनिवारी (दि.2 ) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या पार्श्‍वभूमीवर पैगंबर जयंतीची जय्यत तयारी पाहावयास मिळाली. यानिमित्त विविध सामाजिक संस्था व मित्र-मंडळांकडून परिसर सजविण्यात आला होता. तसेच, मशिदींवरही आकर्षक रोषणाई करण्यात आल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण आहे.

Saturday, 2 December 2017

मन कि बात फेम चंद्रकांत कुलकर्णी यांची मागणी - पुणे मेट्रो फेज 1 ला 'निगडी'पासून मंजुरी द्यावी

#MaanKiBaat fame Chandrakant Kulkarni's Maan Ki Baat tells govt to "Start #PuneMetro phase 1 from Nigdi ASAP" पंतप्रधानांनी 'मन कि बात' या लोकप्रिय कार्यक्रमात ज्यांचा सन्मान केला ते चिंचवडचे चंद्रकांत कुलकर्णी यांची 'मन कि बात' आहे "पुणे मेट्रो फेज १ ला 'निगडी'पासून त्वरित मंजुरी द्यावी"