Monday, 18 December 2017

असुविधांची “व्हॉट्‌स्‌ अॅप’ वर तक्रार करा

पिंपरी – शहरातील नागरिकांना महापालिकेच्या कोणत्याही विभागाची तक्रार आता 9922501450 या “व्हॉट्‌स्‌ अॅप’ वर करता येणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील नागरिकांना त्यांच्या समस्यांबाबत तक्रार दाखल करण्यासाठी महापालिकेने विविध माध्यमे उपलब्ध करुन दिलेली आहेत. सद्यस्थितीत “वेबपोर्टल’, “एस.एम.एस.’, “ई-मेल’, लोकशाही दिन, मोबाईल अॅप, सारथी हेल्प लाईन व “की-ऑस्क’द्वारे तक्रारी स्विकारण्यात येत आहेत. तक्रार दाखल करणे अधिक सोयीचे होण्यासाठी व्हॉटस्‌ अॅप वर तक्रार स्विकारण्याची सुविधा देण्यात आली.

Pune Police launch 'mission to save lives of 2-wheeler riders'

A poster, put up by city police, highlights the use of helmets.
Pune Police have launched a ‘mission to save the lives of two-wheeler riders’ in the city, and as the first step of the initiative, they are trying to spread awareness about mandatory use of helmets for riders. The move comes after a series of articles in Pune Newsline highlighted the large number of deaths of two-wheeler riders in the city, and the fact that most of them weren’t wearing helmets when they met with accidents.

‘सकाळ’संगे चित्राविष्कार रंगे

पिंपरी - सकाळची थंड हवा, कोवळ्या उन्हाची किरणे, अशा आल्हाददायक वातावरणात शहरातील हजारो विद्यार्थ्यांनी ‘सकाळ’तर्फे आयोजित चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सकाळच्या कोवळ्या उन्हात शाळांच्या पटांगणात बसलेले विद्यार्थी आपल्या कल्पनाशक्‍तीला वाव देत रंगरेषांच्या दुनियेत रमले होते. काही शाळांनी ‘खास’ बैठक व्यवस्था केल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर चैतन्य होते.

आर्थिक दुर्बलांना घरे

पिंपरी-चिंचवडमध्ये घरकुलासाठी लाभार्थींची सोडत
‘आजचा दिवस म्हणजे घरकुल लाभार्थींच्या जीवनातील सुवर्ण दिवस आहे, आजपासून त्यांना स्वत:चे व हक्काचे घर साक्षात मिळणार आहे. घरकुल योजना राबविणारी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका ही आपल्या देशातील, तसेच महाराष्ट्रातील एकमेव महानगरपालिका आहे. माणसाला आयुष्यात स्वतःचे हक्काचे घर असावे अशी अपेक्षा असते. त्यादृष्टीने माणूस मार्गक्रमण करीत असतो. पंतप्रधान आवास योजनेद्वारे गरजू नागरिकांना घरे देण्याचा प्रयत्न केला जाईल,’ असे आश्वासन महापौर नितीन काळजे यांनी दिले.

निगडी येथील आण्णा भाऊ साठे यांचा पुतळा हटविला; सोमवारी बहुजन संघटनांचा महापालिकेवर मोर्चा

पिंपरी (Pclive7.com):- निगडी येथील साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांचा अर्धाकृती पुतळा शनिवारी कोणत्याही मातंग समाजाच्या नेत्याला विश्वासात न घेता हलविण्यात आला. पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त आणि सत्ताधारी यांच्या संगनमताने हे कृत्य करण्यात आले असल्याच्या निषेधार्थ सोमवार दि.१८ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता शहरातील बहुजन संघटना तसेच सर्वपक्षीयांच्यावतीने महापालिकेवर ‘जाब दो..’ आंदोलन करण्यात येणार आहे.

पिंपरीगाव ते पिंपळे सौदागर समांतर पुलाचे काम लवकरच सुरू होणार – संदीप वाघेरे

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी वाघेरे गाव ते पिंपळे सौदागर मार्गातील नदीवरील नियोजित १२ मीटर समांतर पुलाचे काम लवकरच होणार अशी माहिती नगरसेवक संदीप वाघेरे यांनी दिली आहे.

वाचन उपक्रमासाठी शिक्षकांना शासनाचे धडे

पिंपरी – महापालिकेच्या प्राथमिक शाळेतील ज्या विद्यार्थ्यांना वाचन जमत नाही, अशांना वाचन उपक्रमांतर्गत केवळ बारा आठवड्यात पुस्तक वाचन शिकविले जाणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या प्राथमिक शाळेसह खासगी प्राथमिक शाळेतील सुमारे चार हजार शिक्षकांना राज्य शासनातर्फे प्रशिक्षण देण्यात येत आहे.