पिंपरी – शहरातील नागरिकांना महापालिकेच्या कोणत्याही विभागाची तक्रार आता 9922501450 या “व्हॉट्स् अॅप’ वर करता येणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील नागरिकांना त्यांच्या समस्यांबाबत तक्रार दाखल करण्यासाठी महापालिकेने विविध माध्यमे उपलब्ध करुन दिलेली आहेत. सद्यस्थितीत “वेबपोर्टल’, “एस.एम.एस.’, “ई-मेल’, लोकशाही दिन, मोबाईल अॅप, सारथी हेल्प लाईन व “की-ऑस्क’द्वारे तक्रारी स्विकारण्यात येत आहेत. तक्रार दाखल करणे अधिक सोयीचे होण्यासाठी व्हॉटस् अॅप वर तक्रार स्विकारण्याची सुविधा देण्यात आली.
No comments:
Post a Comment