Monday, 18 December 2017

...तर गाडीचा थेट लिलाव


यापुढे रस्ते, फूटपाथ किंवा सार्वजनिक जागेत गाडी सोडून दिल्यास खैर नाही. गाडीला नोटीस लावल्यापासून दोन दिवसांत अशा गाड्या महापालिका उचलून नेणार असून त्यांची रवानगी गोडाऊनमध्ये होणार आहे. दंड भरून ३० दिवसांत गाडी सोडवली नाही तर गाडीचा थेट लिलाव करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

औषध दुकाने हवी वातानुकूलित

प्रतिजैविके, जीवनशैलीमुळे उद‍्भवणा‍ऱ्या आजारांसाठी घेण्यात येणारी औषधे तसेच शेड्युल औषधे ठेवण्यासाठी प्रत्येक औषध दुकानामध्ये किमान तापमान २५ अंश से. असायलाच हवे, असे निर्देश अन्न व औषध प्रशासनाने दिले आहेत. हा नियम अन्न व औषध नियमावलीमध्ये समाविष्ट असला तरीही त्याचे पालन होत नसल्याने हे निर्देश देण्यात आले आहेत.

शहराचे ‘स्वच्छता दूत’ व्हा

स्थायी समिती अध्यक्ष, आयुक्तांचे नागरिकांना आ‍वाहन

‘महिला संसाराची गाडी सक्षमपणे पुढे नेतात. त्याचप्रमाणे शहर स्वच्छतेची गाडीही पुढे नेण्यासाठी सर्व महिलांनी महापालिकेला सहकार्य करावे. आपण आपल्या शहराचे जबाबदार नागरिक म्हणून स्वच्छता अॅप डाउनलोड करावे. त्या माध्यमातून शहरातील स्वच्छता विषयक समस्या महापालिकेकडे पाठवता येतील व त्यावर महापालिका २४ ते ४८ तासांत कार्यवाही करेल. शहराच्या कोणत्याही भागात कचरा पडलेला असल्यास शहरातील प्रत्येकाने सजग नागरिक म्हणून ही बाब महापालिकेच्या निदर्शनास आणून द्यावी. शहरातील प्रत्येक नागरिकाने महापालिकेचे स्वच्छता दूत म्हणून काम करावे,’ असे आवाहन स्थायी समितीच्या अध्यक्ष सीमा सावळे यांनी केले.

‘सार्वजनिक’ला पेट्रोल डिलर असोसिएशनचा मात्र नकार

महापालिकेने घ्यावी जबाबदारी : अन्यथा विरोध कायमची भूमिका
पुणे – पेट्रोल पंपावरील स्वच्छतागृहे सार्वजनिक करण्यास पेट्रोल डिलर असोसिएशनने तीव्र विरोध केला आहे. सार्वजनिक स्वछतागृहे ही महापालिकेची जबाबदारी असून त्यांनी ती ताब्यात घेऊन नागरिकांसाठी खुली करावीत, अशी मागणी करत या निर्णयास संघटनेचा विरोध असून त्याबाबत लवकरच निर्णय जाहीर केला जाणार असल्याचे संघटनेचे राष्ट्रीय प्रवक्ते अली दारूवाला यांनी “प्रभात’शी बोलताना सांगितले.

पेट्रोल पंपांची स्वच्छतागृहे आता ‘सार्वजनिक’

आयुक्तांचा आदेश : स्वच्छ भारत अभियानांतर्गत केंद्राचे निर्देश
पुढील दोन दिवसांत पूर्ण होणार सर्वेक्षण

पुणे – केंद्रशासनाच्या निर्देशानुसार, पुणे महापालिका हद्दीतील शासकीय तसेच खासगी पेट्रोल पंपांवरील स्वच्छतागृहे यापुढे “सार्वजनिक’ असणार आहेत. त्याबाबतचा आदेश आयुक्त कुणाल कुमार यांनी शनिवारी दिले आहेत. पुणे शहरात सुमारे 150 पेट्रोल पंप असून तेथे सुमारे 500 टॉयलेट सीट्‌स असल्याचा अंदाज आहे.

शहरात अनधिकृत फलकांचे सर्वेक्षण सुरु

पिंपरी – शहरात अनधिकृतपणे चौकात, बाजारपेठेत, सार्वजनिक गजबजलेल्या ठिकाणी वाढदिवस, खासगी कार्यक्रम, उपक्रम आणि व्यवसायिक जाहिराती लावून शहराचे विद्रुपीकरण होवू लागल्याने स्थायी सभेत अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. त्यानंतर आयुक्‍तांच्या आदेशाने शहरातील सर्व फलकांचे सर्वेक्षण सुरु केले असून येत्या दोन महिन्यात अनधिकृत फलक नेमकं किती याबाबत चौकशी अहवाल आयुक्‍तांकडे सादर करण्यात येणार आहे.

स्वच्छ सर्वेक्षणात खासगी रुग्णालयांची तपासणी

पिंपरी – महापालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षणात शहरातील खासगी रुग्णालये, हॉटेल्सची स्वच्छता तपासणी करण्यात येणार आहे. सर्वेक्षणास अधिकाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांनी केले.