Wednesday, 7 February 2018

खासदार अमर साबळेंच्या सहकार्यातून ३५ मोतीबिंदू पीडितांची मोफत शस्त्रक्रिया

मोतीबिंदू आजाराने पीडित असणाऱ्या ३५ रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया करणार असल्याचा संकल्प राज्यसभा खासदार अमर साबळे यांनी केला आहे.

कुस्ती शौकिनांसाठी आकुर्डीत आमदार फंडातून ५ लाखाची मॅट प्रदान

पिंपरी चिंचवड शहरातील उदयमुख होतकरू कुस्ती खेळाडूंसाठी शिवसेना आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांनी आपल्या आमदार निधीमधून ५ लाख रुपयांची अंतरराष्ट्रीय दर्जाची मॅट प्रदान केली.

राज ठाकरे २१ फेब्रुवारीला घेणार शरद पवार यांची मुलाखत

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची मनसे अध्यक्ष राज ठाकरे घेणार असलेल्या बहुचर्चित मुलाखतीला अखेर मुहूर्त सापडला आहे. २१ फेब्रुवारीला ह्या बहुचर्चित मुलाखतीचा कार्यक्रम साकारला जाणार आहे. पुण्यातील बीएमसीसी महाविद्यालयाच्या प्रांगणात सायंकाळी ही जाहीर मुलाखत रंगणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

भ्रष्टाचार कुंडल्याच्या जंत्रीने विरोधक घायाळ

पिंपरी – रस्त्यांच्या 425 कोटी रुपयांच्या निविदा प्रक्रियेत रिंग करुन सुमारे 90 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राष्ट्रवादी, शिवसेनेने करत सत्ताधारी भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांनी तत्कालीन राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकाळातील भ्रष्टाचाराच्या कुंडल्या महापालिका सभागृहात वाचून दाखवल्याने विरोधी नगरसेवकांनी सभागृहातून काढता पाय घेतला. त्यांनी टीका करणाऱ्यांची नावे उघड करत तत्कालीन स्थायीच्या सर्वच सभापतींची चौकशी करुन कोट्यवधींचा मलिदा लाटणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. रिंग झाल्याची टीका करणाऱ्यांना रिंगा (बागड्या) घालणार आहे, असे सांगत तुम्ही डल्ला मारुन आता आमच्यावर हल्ला करु नका, असे खुले आव्हान देखील सीमा सावळे यांनी यावेळी विरोधकांना दिले.

राजकारणात तरुणांना चांगल्या संधी - सीमा सावळे

पिंपरी - ‘‘राजकारण वाईट आहे; तर ते साफ करण्यासाठी तुम्हालाच त्यामध्ये यावे लागेल. राजकारणात तरुणांना चांगल्या संधी निर्माण झाल्या आहेत,’’ असे प्रतिपादन स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांनी येथे केले. सकाळ ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ (यिन) यांच्या वतीने येथील एएसएम महाविद्यालयात आयोजित ‘सकाळ यिन संवाद’मध्ये त्या बोलत होत्या. त्या वेळी प्राचार्य डॉ. के. एम. जाधव, प्रा. सुभाष देवकुळे व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. दरम्यान, विद्यार्थ्यांनी तरुणांच्या राजकारणातील सहभागाबाबत चर्चा केली. सावळे म्हणाल्या, ‘‘राजकारणात नवीन येणाऱ्यांना संघर्ष करावा लागतो. मात्र, संघर्षातून मिळालेल्या विजयाचा आनंद वेगळाच असतो. त्यामुळे तडफदार तरुणांनी राजकारणात आले पाहिजे. कारण तरुण देशाचे भविष्य आहेत.’’ राजकारणी जर चुकत असतील तर त्यांची चूक त्यांना ठामपणे दाखवली पाहिजे.

Tuesday, 6 February 2018

हिंजवडी, माणसह आठ गावांचा पिंपरी पालिकेत समावेश: सर्वसाधारण सभेची मंजुरी

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत हिंजवडी, माण, मारुंजी, सांगवडे, गहुंजे, नेरे आणि जांबे या सात गावांचा समावेश करण्यास राज्य शासनाने दीड वर्षापूर्वी नकार दिला होता. परंतु, ही गावे समाविष्ट करून घेण्यास महापालिका सर्वसाधारण सभेने आज (सोमवारी) मंजुरी दिली आहे.

हिंजवडी, माणसह आठ गावांचा पिंपरी पालिकेत समावेश: सर्वसाधारण सभेची मंजुरी

सात नगरसेवकांसोबत आठ जणांना शिक्षण समितीत स्थान

पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये शिक्षण समिती स्थापन करण्याचा निर्णय आज (सोमवारी) महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने घेतला आहे. पंधरा सदस्यांच्या या समितीमध्ये सात नगरसेवक आणि  आठ शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील तज्ज्ञांची समावेश असणार आहे.

सात नगरसेवकांसोबत आठ जणांना शिक्षण समितीत स्थान