वाल्हेकरवाडी - रावेतमधील तुकाराम पुलाजवळील चौकात बेशिस्त वाहनचालक, व्यावसायिकांचे अतिक्रमण, पोलिसाचा अभाव या कारणांनी वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. परिणामी, दररोज छोटे-मोठे तीन ते चार अपघात होत आहेत. या सर्व समस्यांनी रावेत चौक अपघाती ठरू लागला आहे.

MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Saturday, 10 February 2018
आरटीओ अधिकाऱ्यांची परिवहनमंत्र्यांकडून कानउघाडणी
चिखली - पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील वाहन निरीक्षकांच्या खासगी दलालराज बाबत परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी शुक्रवारी परिवहन अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली.
निगडीत रविवारी होणा-या ‘रनेथॉन ऑफ होप’ 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धेत आठ हजार जण होणार सहभागी
रोटरी क्लब ऑफ निगडी यांच्यातर्फे येत्या रविवारी (दि.11) आयोजित केलेल्या आठव्या ‘रनेथॉन ऑफ होप 2018 या अर्ध मॅरेथॉन स्पर्धेत आठ हजार जण सहभागी होणार आहेत. रविवारी सकाळी पावणेसहा वाजता या स्पर्धेला सुरुवात होणार आहे.
सोसायट्यांची निवडणूक नियमांच्या कचाट्यात
पिंपरी - सहकारी गृहरचना (हाउसिंग सोसायट्या) संस्था निवडणूक प्रक्रियेसाठी पुढे येत नसल्याची खंत सहकार खात्याकडून व्यक्त केली जात आहे. किचकट-वेळखाऊ प्रक्रिया, जाचक अटी आणि उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा ‘असहकार’ या सोसायट्यांना निवडणुकीपासून परावृत्त करीत असल्याचा दावा काही सोसायट्यांनी केला आहे. परिणामी, निवडणुकीच्या या नियमांमधून सहकारी गृहरचना वगळण्याबाबतचा सूर उमटू लागला आहे. दरम्यान, राज्य सहकारी गृहनिर्माण संघाने निवडणूक प्रक्रियेत बदल सुचविणारी शिफारसही सहकार खात्याकडे केली आहे.
जीएसटीमुळे देशाची प्रतिमा उंचावणार असल्याचे तज्ञांचे मत!
केंद्र सरकारने सेवा व वस्तू कर (जीएसटी) लागु करून एक धाडसी निर्णय घेतला आहे. जीएसटीच्या माध्यमातून देशाच्या तिजोरीत १८ लाख करोड जमा झालेत. करदात्यांच्या संख्येत वाढ होत आहे. जीएसटीच्या कर माध्यमातून जगात आपल्या देशाची प्रतिमा उंचावणार आहे. असा सुर तज्ञ मान्यावरांनी काढला.
चिंचवडमध्ये आजपासून गृहप्रकल्पांचे भव्य प्रदर्शन
पिंपरी - रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीचे विविध पर्याय एकाच छताखाली उपलब्ध करून देणारा ‘सकाळ वास्तू एक्स्पो’ आजपासून चिंचवड येथील ऑटो क्लस्टर एक्झिबिशन सेंटरमध्ये सुरू होत आहे. आयकर आयुक्त संदीप गर्ग यांच्या हस्ते सकाळी ११.३० वाजता उद्घाटन होणार आहे.
Subscribe to:
Posts (Atom)