Tuesday, 6 March 2018

पीएमपीची स्थानके किती ? प्रशासनालाच नाही माहिती

पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) बस स्थानके किती, असा प्रश्न विचारल्यास प्रशासनाकडून १६ असे उत्तर दिले जाईल. मात्र, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि आसपासच्या परिसरात एकूण ७६ बस स्थानके असल्याचा दावा पीएमपी प्रवासी मंचाचे कार्यकर्ते आणि बस स्थानकांचा अभ्यास करणाऱ्या रुपेश केसेकर यांनी केला आहे. त्यांच्यामते एका ठिकाणावरून दोनपेक्षा अधिक मार्गांवर सोडण्यात येणाऱ्या बस आणि दोन बसमधील वारंवारिता १० मिनिटांपेक्षा जास्त आहेत, अशी एकूण ७६ बस स्थानके असून, पीएमपी प्रशासनाला त्याची माहिती नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

how many stations of pmp no information from the administration

लोणावळा ते पुणे रोडस्टार सायकल स्पर्धा

पुणे – महाराष्ट्राचे शिल्पकार व माजी उपपंतप्रधान स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी (दि. 12) लोणावळा ते पुणे रोडस्टार सायकल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

धर्मादाय रुग्णालयात उपचारासाठी निर्धन, दुर्बल घटकांच्या आर्थिक उत्पन्न मर्यादेत वाढ

पुणे – धर्मादाय रुग्णालयांमध्ये उपचारासाठी निर्धन आणि दुर्बल घटक रुग्णांच्या आर्थिक उत्पन्न मर्यादेमध्ये वाढ करण्यात आली आहे. आता 85 हजार रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या निर्धन आणि 1 लाख 60रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या दुर्बल घटकातील व्यक्तींना धर्मादाय रुग्णालयात उपचार घेता येणार आहे. पुणे विभागाचे धर्मादाय सह आयुक्त एस.बी.कचरे यांनी याबाबतचे परिपत्रक नुकतेच काढले आहे.

‘Cycle-sharing scheme has helped me exercise or pedal anytime of the day’

Though cycle-sharing has also grown popular among students at Savitribai Phule Pune University, College of Agriculture and Khadki Cantonment limits, the baton for this task was first taken collectively by 20 residential societies in Pimple Saudagar suburbs of Pimpri-Chinchwad

ऐन उन्हाळ्यात ‘जलयुक्त’ची कमाल; राज्यात केवळ 257 टँकर

ऐन उन्हाळ्यात ‘जलयुक्त’ची कमाल; राज्यात केवळ 257 टँकर

रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीने शिवजयंती केली नदी स्वच्छतेतून साजरी

पिंपरी (Pclive7.com):- रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या ‘जलपर्णी मुक्त स्वच्छ व सुंदर पवनामाई उगम ते संगम’ या अभियानाचा १२१ वा दिवस केजुबाई बंधारा थेरगाव बोट कल्ब येथे पार पडला. शिवजयंतीचे औचित्य साधून नदी घाटावर शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून अभियानाला सुरवात करण्यात आली. अभियानात २०० लोक सहभागी झाले होते. यावेळी नदीघाटावर समर्थ क्रिएटीव्ह एनलाईटर्स ग्रुप चे २५ स्वयंसेवक सागर दाणी यांच्या मार्गदर्शनाखाली घाटावर श्रमदानासाठी सहभागी झाले. आर्मी रिटायर्ड सचिन घाडगे तसेच ऑटोमोबाईल क्षेत्रातील अग्रगण्य नाव म्हणजेच बी यु भंडारी ऑटो मोबाईल्स व ट्रम्प बाईक्सचे संचालक शैलेश जयकुमार भंडारी हे देखील अभियानासाठी उपस्थित होते.

पिंपरी विधानसभेवर “आठवले बॉम्ब’

केंद्रीय सामाजिक व न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या शहरातील दौऱ्याने शहरातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. पिंपरी विधानसभेवर रिपब्लिकन पक्षाने आपला दावा सांगत भाजपच्या इच्छुकांना अडचणीत आणले आहे. तर शिवसेनेला देखील युतीत आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगत दुसरा राजकीय बॉम्ब टाकत त्यांनी एकाच दगडात आठवलेंनी दोन पक्षी मारले आहेत.