पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीतील पुढचे पाऊल टाकत पिंपरी विधानसभेकरिता आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून जोरदार शक्तिप्रदर्शन केले. त्यांच्या या शक्ति प्रदर्शनामुळे पिंपरी विधानसभा मतदार संघातील इच्छूकांची संख्या वाढली असली, तरी देखील ओव्हाळ यांच्या रुपाने आणखी एक तगडा उमेदवार विधानसभेकरिता रिंगणात उतरणार असल्याचा दावा त्यांचे समर्थक करत आहेत.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Sunday, 3 June 2018
ड्रेनेज चेंबर फोडणाऱ्यावर गुन्हा दाखल
सांगवी – नदीच्या काठाहून मैला शुद्धीकरण केंद्राकडे जात असणाऱ्या ड्रेनेज लाईनचा चेंबर फोडून सर्व मैलापाणी मुळा नदीत सोडण्याचे कृत्य गेल्या बऱ्याच दिवसांपासून घडत आहे. मैला शुद्धीकरण केंद्रात एक थेंबही पाणी न सोडता सर्व मैलापाणी नदीत सोडण्याच्या या कृत्याला दैनिक प्रभात ने प्रकाशित केले. याबाबत मनपा अधिकाऱ्याने ड्रेनेज चेंबर फोडणाऱ्या अज्ञात इसमाविरुद्ध सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
अखेर महापालिकेला जाग
पिंपरी – मॉन्सून पूर्व पावसाने झोडपल्यानंतर जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने आज तातडीची बैठक घेतली. अतिवृष्टी अथवा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केल्यास नदीकाठच्या भागांमध्ये पूर परिस्थिती निर्माण होते. ही स्थिती हाताळण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने मुख्य प्रशासकीय इमारतीत पूरनियंत्रण आपत्ती निवारण कक्ष तर आठ प्रभाग कार्यालयातही कक्षाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला.
अनधिकृत बांधकामे हटविण्यासाठी आयुक्तांना निवेदन
पिंपरी – उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार पिंपरी चिंचवड येथील सर्व अनधिकृत बांधकामे हटविण्यासाठी अशोक काची यांनी आयुक्तांना निवेदन दिले आहे.
खासदारांच्या कार्यपूर्ती अहवालाचे प्रकाशन
पिंपरी – मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या कारर्कीदीला चार वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यांच्या कार्यपूर्ती अहवालाचे प्रकाशन शुक्रवारी (दि.1) शिवसेना भवन मुंबई येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार मनोहर भोईर उपस्थित होते.
बढ़ते अपराधों की वजह देहूरोड बना बिहार ?
पिंपरी-चिंचवड के देहूरोड इलाके में दिन पर दिन अपराधियों की दहशत बढ़ती जा रही है, अपना वर्चस्व स्थापित करने के लिए गैंग रोजाना आतंक मचा रही है। जिसकी वजह से नागरिकों में भय का माहौल बढ़ता ही जा रहा है। दहशत फैलाने के उद्देश्य से गाड़ियों की तोड़फोड़, महिलाओं के साथ मारपीट, नाबालिग लड़कों का गैंग में सहभाग बढ़ता जा रहा है, बदमाशों के जन्मदिन को मनाने के लिए गाड़ियों की तोड़फोड़ और दिनदहाड़े तलवारे लेकर घूमने जैसा माहौल देहूरोड में आम बात हो गई है, इससे साफ जाहिर होता है कि देहूरोड अपराध जगत में बिहार बनता जा रहा है।
डिजिटल कार्यशाळेला महिलांचा प्रतिसाद
जुनी सांगवी : जुनी सांगवी येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने नगरसेविका शारदा सोनवणे यांनी आयोजन केलेल्या डिजिटल महिला कार्यशाळेला महिलांनी उत्सफुर्त प्रतिसाद दिला.

Subscribe to:
Posts (Atom)