पिंपरी (Pclive7.com):- मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या कारर्कीदीला चार वर्ष पुर्ण झाली आहेत. शिवसेना भवन मुंबई येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते खासदार बारणे यांच्या कार्यअहवालाचे प्रकाशन करण्यात आले.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Monday, 4 June 2018
स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडेंना पिंपरी चिंचवड भाजपातर्फे अभिवादन
पिंपरी (Pclive7.com):- भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहरच्या वतीने स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या चौथ्या पुण्यतिथीच्या निमित्ताने अभिवादन करण्यात आले. भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेचे पुजन तसेच पुष्पहार अर्पन करून अभिवादन करण्यात आले.
गॅस,पेट्रोल दरवाढीचा पिंपरीत कॉंग्रेसतर्फे निषेध
गॅस सिलिंडर,पेट्रोल, डिजल दरवाढीस जबाबदार असणा-या केंद्रातील भाजप सरकारचा पिंपरी चिंचवड शहर कॉंग्रेसच्या वतीने शनिवारी (दि. 2 जून) निषेध करण्यात आला. सिलिंडरचे प्रतीकात्मक पूजन करण्यात आले. तसेच महागाईच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
जलपर्णीमुक्त पवनामाई मोहीम
पिंपरी-चिंचवड शहरातील पवना नदीला जलपर्णीचा विळखा पडल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला होता. महापालिकेला यासंदर्भात नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. मात्र जलपर्णी काढण्याकडे दुर्लक्ष झाल्याने कुणाल लांडगे स्पोर्टस फाउंडेशनच्या वतीने जलपर्णीमुक्त पवनामाई उपक्रम राबविण्यात आला. कासारवाडी येथे घेण्यात आलेल्या दुसऱ्या आठवड्यातही उपक्रमास युवकांचा उस्त्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शेतकरी संपामुळे भाज्यांचे भाव दुप्पट
पिंपरी : शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे पिंपरी कॅम्प येथील भाजी मंडईत शेतीमालाची आवक कमी झाली. फळभाज्यांचे भाव रविवारी 10 ते 15 टक्क्यांनी वाढले. गाळ्यावरील माल संपल्याने दुपारनंतर जवळपास 10 ते 15 भाजी विक्रेत्यांना गाळे बंद ठेवावे लागले. चिंचवड भाजी मंडईतही भाजीपाल्याचे भाव दुप्पट झाले.

Subscribe to:
Posts (Atom)