पिंपरी-शहरातील खड्डे प्रश्नावर गाजली पिंपरी पालिकेची सभा !
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Sunday, 22 July 2018
आयटी पार्कचा तिढा सुटेना!
हिंजवडी आयटी पार्कपर्यंत सुस्साट पोहोचण्याचे आयटीयन्सचे स्वप्न अजूनही दृष्टीक्षेपात येण्याची चिन्हे नाहीत. आयटी पार्कमधील वाहतुकीच्या समस्येत सातत्याने वाढच होत असून, पावसाच्या आगमनानंतर या भागातील विविध ठिकाणी सुरू असलेल्या रस्त्या रुंदीकरणास खीळ बसल्याने आयटीयन्सला ऑफिसला जाण्यासाठी लागणाऱ्या वेळेत वाढ झाल्याचे चित्र आहे. 'मटा'ने यासंदर्भात पाहणी केली असता अनेक आयटी कर्मचाऱ्यांनी त्यांना ऑफिसला जाण्यास लागत असलेल्या तासन्तास उशिराचा पाढाच वाचला.
मालवाहतूकदारांच्या संपाच्या दुसऱ्या दिवशी भुसार बाजारातील आवक घटली
पिंपरी-चिंचवड उपबाजारातही आवक कमी
मांजरी, मोशी आणि उत्तमनगर उपबाजारांमध्ये आवक नेहमीच्या तुलनेत
सर्वच बाजारात भाव स्थिर

मांजरी, मोशी आणि उत्तमनगर उपबाजारांमध्ये आवक नेहमीच्या तुलनेत
सर्वच बाजारात भाव स्थिर
शहर पोलीस आयुक्तालय प्रेमलोक पार्कमध्येच होणार; महापालिका सर्वसाधारण महासभेची मान्यता
पिंपरी चिंचवड शहरात गेल्या कित्येक वर्षापासून रखडलेले स्वतंत्र नवीन पोलीस आयुक्तालय चिंचवडच्या प्रेमलोक पार्क मधील महात्मा फुले शाळेच्या इमारतीमध्येच होणार अहे. त्यासाठी शाळेची इमारत पोलिसांना भाडे तत्वावर देण्यासाठीच्या विषयाला आज शुक्रवारी (दि. 20) महासभेने मान्यता दिली आहे.
पिंपरीत शहर पोलिसांचे ‘सुरक्षा अभियान’
पीएमपी बसमधील वारंवार होणाऱ्या चोऱ्यांवर आळा घालण्यासाठी पिंपरीतील परिमंडळ तीनच्या पोलिसांनी सुरक्षा अभियान सुरु केले आहे. या अभियानाअंतर्गत महिला पोलिस कर्मचारी पीएमपी बसमधील प्रवाशांची जनजागृती करणार आहेत. आज (शुक्रवार) याचा शुभारंभ पिंपरीतील आंबेडकर चौकातून करण्यात आला.
“त्या’ स्वच्छतागृहाकडे दुर्लक्षच
पिंपरी – पिंपरीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात असलेले महिला स्वच्छतागृह 12 डिसेंबर 2017 मध्ये अज्ञातांनी जाळले होते. या घटनेला सात महिने उलटून गेले तरी नवीन स्वच्छता गृह तर सोडाच या स्वच्छतागृहाची दुरुस्ती देखील महापालिकेने केलेली नाही. त्यामुळे महिलांची कुचंबना होत आहे.
शहरातील स्वच्छतागृहांची दयनीय अवस्थेत
इसिएने दिले आयुक्तांना निवेदन
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने शहरात उभारण्यात आलेल्या स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे. शहरात नागरिकांच्या मुलभूत गरजा भागविण्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे. सार्वजनिक शौचालय सारख्या मुलभूत सुविधा स्वच्छ भारत अंतर्गत पुरविल्या आहेत. पण त्या सोयी-सुविधांची दैनंदिन काळजी व जोपासना करण्याची जबाबदारी पार पाडण्यात पालिका अयशस्वी झाली आहे. आपण त्वरित शहरातील सर्व शौचालये आणि सार्वजनिक जागांची दैनंदिन स्वच्छता व निगा राखण्याबाबत धोरण अमलात आणून नागरी आरोग्याच्या बाबत कठोर पावले उचलावीत. आपल्या शहरातील स्वच्छ भारत अंतर्गत उभारलेली स्वच्छतागृह बेवारस झाली आहेत. त्यांच्या साफ-सफाईची कामे त्वरीत पूर्ण करावीत, अशा मागणीचे निवेदन इसिएतर्फे महापालिका आयुक्तांना दिल्याचे संचालक विकास पाटील यांनी सांगितले.
Subscribe to:
Posts (Atom)